कॉन्व्हेंटमध्ये फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला ननचा मृतदेह, पोलिसांनी वर्तवला असा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:11 IST2025-09-16T17:11:37+5:302025-09-16T17:11:41+5:30
Kerala Crime News: केरळमधील कोल्लम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे असलेल्या एका कॉन्व्हेंटमध्ये एका ननचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

कॉन्व्हेंटमध्ये फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला ननचा मृतदेह, पोलिसांनी वर्तवला असा संशय
केरळमधील कोल्लम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे असलेल्या एका कॉन्व्हेंटमध्ये एका ननचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुळची तामिळनाडूमधील असलेल्या ३३ वर्षीय ननचा मृतदेह सोमवारी संध्याकाळी कॉन्व्हेंटमध्ये असलेल्या एका खोलीमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला., पोलिसांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली आहे.
कोल्लम (पूर्व) पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी सदर ननला रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, या महिलेच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. मात्र त्यामध्ये केवळ ती मानसिक समस्यांमुळे त्रस्त असल्याचा उल्लेख आहे. आता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा खटला दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.