शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाखाच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 06:34 IST

एकूण रुग्णसंख्या ६४ लाख; ५३ लाख लोक झाले बरे

नवी दिल्ली : देशामध्ये शुक्रवारी कोरोनाचे ८१,४८४ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ६४ लाखांहून अधिक झाली आहे. तसेच आतापर्यंत ५३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनामुळे आणखी १०९५ लोक मरण पावले असून त्यामुळे बळींची एकूण संख्या एक लाख ३२३ वर गेली आहे.

देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ६३,९४,०६८ इतकी असून ५३,५२,०७८ जण या आजारातून बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८३.७० टक्के आहे. गेल्या १२ दिवसांत १० लाख कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात ९,४२,२१७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १४.७४ टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांचा मृत्युदर १.५६ टक्के इतका कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा सुमारे १० लाखांनी कमी आहे. तर, रुग्णसंख्येच्या क्रमवारीत तिसºया क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये ४८ लाख कोरोना रुग्ण आहेत.

कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,५८६, कर्नाटकमध्ये ८,९९४, आंध्र प्रदेशमध्ये ५,८६९, दिल्लीमध्ये ५४०१, पश्चिम बंगालमध्ये, गुजरातमध्ये ३,४६०, पंजाबमध्ये ३,४५१, मध्य प्रदेशमध्ये २,३३६ इतकी आहे.

चाचण्यांची संख्या सात कोटी ६७ लाखांवरइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकलरिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेदिलेल्या माहितीनुसार, १ आॅक्टोबर रोजी १०,९७,९४७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ७,६७,१७,७२८ आहे.२०३ दिवसांत एकावरून एक लाखांवर पोहोचली बळींची संख्या30.94% इतका उच्चांकी मृत्युदर भारताने ३ एप्रिल रोजी गाठला होता. तो आता १.५६ टक्के इतका कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूMumbaiमुंबई