आता भाड्याने घेता येणार नमो भारत ट्रेन, चित्रपट-डॉक्युमेंटरीचे होणार शूटिंग, जाणून घ्या 1 तासाचे भाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 15:12 IST2024-01-06T15:10:56+5:302024-01-06T15:12:08+5:30
शूटिंग व्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी RRTS परिसर भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता भाड्याने घेता येणार नमो भारत ट्रेन, चित्रपट-डॉक्युमेंटरीचे होणार शूटिंग, जाणून घ्या 1 तासाचे भाडे
नवी दिल्ली : भारत सरकारने दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने National Capital Region Transport Corporation (NCRTC) सुरू केले आहे. या अंतर्गत Regional Rapid Transit System (RRTS) ची सुविधा पुरवली जात आहे. RRTS मुळे लोक स्थानिक ठिकाणी सहज आणि कमी वेळेत पोहोचू शकतात. हे स्टेशन दिसायला खूप सुंदर आहे आणि येथील ट्रेन्स सुविधांनी सुसज्ज आहेत. आता या ट्रेन्स चित्रपट आणि डॉक्युमेंट्रीच्या शूटिंगसाठी भाड्याने देण्याचेही नवीन धोरण तयार करण्यात आले आहे.
NCRTC ने अलीकडेच चित्रपटाच्या शूटिंगसह अन्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी RRTS स्टेशन परिसर आणि प्रतिष्ठित नमो भारत ट्रेन्स भाड्याने उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यापक धोरण तयार केले आहे. या धोरणांतर्गत, RRTS स्टेशन परिसर आणि नमो-भारत ट्रेन आता चित्रपट शूटिंग, डॉक्युमेंट्री आणि टीव्ही जाहिराती इत्यादींसाठी अल्प-मुदतीच्या भाड्यावर उपलब्ध आहेत.
गेल्या काही काळापासून अनेक चित्रपट आणि डॉक्युमेंट्रीचे शूटिंग ट्रेनमध्ये होत आहे. विशेषतः ओटीटी, फीचर फिल्म्स, डॉक्युमेंट्री आणि वेब सिरीजचे चित्रीकरण ट्रेनमध्ये होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत या ट्रेन्स आणि स्टेशनचे सौंदर्य दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेत आहे. NCRTC चा हा निर्णय आधुनिक शूटिंग लोकेशन्सच्या शोधात असलेल्या चित्रपट निर्मात्यांसाठी एक आकर्षक संधी आहे.
शूटिंग व्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी RRTS परिसर भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी (महसूल नसलेल्या वेळेत) नमो भारत ट्रेनची आवश्यकता असल्यास तुम्ही वैयक्तिक कार्यक्रमांसाठी देखील ते बुक करू शकता. NCRTC परिसर आणि ट्रेन्स तासाभराच्या भाड्याने उपलब्ध असतील. यासंबंधी भाडे खाली दिले आहे.
- नमो भारत ट्रेनमध्ये 2,00,000/- प्रति तास
- RRTS स्टेशनमध्ये प्रति तास 2,00,000/-
- नमो भारत ट्रेन आणि स्टेशनवर 3,00,000/- प्रति तास
- डेपो/साइट्स 2,50,000/- प्रति तास