शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होणार एनएसजी; 'अशी' असणार सरकारची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 09:45 IST

एनएसजी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू होताच केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरोधातील कारवाई आणखी आक्रमक केली आहे. त्यामुळेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सना (एनएसजी) जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कमांडो राज्याच्या पोलीस दलातील जवानांना दहशतवाद्यांचा प्रभावीपणे सामना कसा करायचा, याबद्दलचं प्रशिक्षण देणार आहेत. एनएसजी कमांडोंना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यामागे अशी आहे सरकारची योजना:दहशतवादविरोधी कारवायांमध्ये हातखंडादहशतवादविरोधी कारवायांमध्ये निष्णात असणारे एनएसजी कमांडो जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना प्रशिक्षण देतील. याशिवाय श्रीनगरच्या विमानतळावर हल्ला होऊ नये, याची जबाबदारीदेखील एनएसजीकडे असेल. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असेल, त्या ठिकाणी एनएसजी कमांडोचा वापर केला जाऊ शकतो. याआधीही जम्मू-काश्मीर पोलिसांना प्रशिक्षणएनएसजी कमांडोंनी याआधीही जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना प्रशिक्षण दिलं आहे. केंद्रातील सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएसजी कमांडो उपकरणांच्या हाताळणीत कुशल असतात. त्यामुळे त्यांचा जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत मोठा फायदा होईल.  कमी अंतरावरील चकमकींमध्ये मदत मिळणारदहशतवादविरोधी अभियानांमधील जाणकारांनुसार, कमी अंतरावर सुरू असणाऱ्या चकमकींमध्ये एनएसजी कमांडोंची मदत मिळू शकते. जम्मू-काश्मीरमधील जवानांना अनेकदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत एनएसजी कमांडोंचा अनुभव महत्त्वाचा ठरु शकतो. नागरी वस्तीत कारवाया करताना जवानांचा अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र अशा कारवायांचा दांडगा अनुभव एनएसजी कमांडोंना आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी एनएसजीनं याची चुणूक दाखवली होती. अत्याधुनिक उपकरणांची मदतदहशतवादविरोधी कारवाया करताना एनएसजी कमांडो अत्याधुनिक शस्त्रसामग्रीचा वापर करतात, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. त्यामुळेच या कमांडोंचा वापर केवळ 26/11 किंवा पठाणकोटसारख्या हल्ल्यांवेळी करता कामा नये, असं सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांना वाटतं. बीएसएफच्या कॅम्पमध्ये एनएसजीच्या तुकड्या असणारजम्मू-काश्मीर पोलिसातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएसजीच्या काही तुकड्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये असतील. यासाठी एनएसजीचे डीजी सुदीप लखटकिया लवकरच श्रीनगरला जाणार आहेत. त्यांच्याकडून कमांडोंना विविध ठिकाणी तैनात केलं जाईल.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerrorismदहशतवादNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा