शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारताच्या 'स्ट्राईक'चे मास्टरमाईंड अजित डोवाल यांना मोदी सरकार-2 कडून 'लई भारी' भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 13:55 IST

अजित डोवाल यांनी चीन सोबतचा डोकलाम विवाद, पाकिस्तानसोबतचा वाद आणि युद्धजन्य स्थितीमध्ये भारताची बाजू भक्कम केली होती.

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि मुत्सद्दी अजित डोवाल यांना भारत सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.

 अजित डोवाल यांनी चीन सोबतचा डोकलाम विवाद, पाकिस्तानसोबतचा वाद आणि युद्धजन्य स्थितीमध्ये भारताची बाजू भक्कम केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवेळीही मोलाचे मार्गदर्शन केले होते. यामुळे त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये बहुमुल्य योगदान दिल्याने सरकारने डोवाल यांना पाच वर्षांसाठी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. 

अजित डोवाल यांनी बहुचर्चित राफेल विमानांच्या खरेदी आणि निवडीमध्येही महत्वाची भुमिका मांडली होती. तसेच त्यांनी भारताला पुढील 10 वर्षे स्थिर सरकारची आवश्यकता असल्याचेही म्हटले होते. जगात, भारताची राजकीय आणि आर्थिक रणनिती आखण्यासाठी हे गरजेचं असल्याचेही डोवाल यांनी स्पष्ट केले होते. सन 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल. मात्र, त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जे निर्णय लोकप्रिय नसतील, पण लोकांच्या हिताचे असतील, असे ते म्हणाले होते. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन करत 303 जागांवर विजय प्राप्त केला आहे. यामुळे गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा भाजपाला आल्याने स्थिर सरकार मिळाले आहे. राष्ट्रीय संरक्षण रणनीती चांगल्याप्रकारे आखल्याचा फायदा भाजपाला झाला आहे. यामुळे डोवाल यांना हे पद देण्यात आले आहे. 

 

भारतासाठी डोवाल यांनी गुप्तहेराचेही काम केले आहे. ते पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 7 वर्षे मुस्लिम बनून राहिले होते. त्यांना भारतीय लष्कराचा सर्वोच्च पुरस्कार कीर्ति चक्रानेही सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिऴविणारे ते पहिले अधिकारी होते. डोवाल हे 1968 च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांना चार वर्षांनी 1972 मध्ये आयबी मध्ये घेण्यात आले. त्यांनी जादातर काम गुप्तचर विभागातच केले आहे. 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा