शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार आल्यास लागू होणार NRC, घुसखोरांची पटणार ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 20:18 IST

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)वरून उठलेलं वादळ काही क्षमण्याचं नाव घेत नाहीये.

नवी दिल्ली- आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)वरून उठलेलं वादळ काही क्षमण्याचं नाव घेत नाहीये. भाजपानं आता पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारे नागरिकांची ओळख पटवली जाणार असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, जर आमच्या पक्षाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं, तर आसामसारखेच पश्चिम बंगालमध्येही राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC) लागू केलं जाईल. आसाममध्ये लागू झालेल्या NRCमुळे काही जण अश्रू ढाळतायत. कारण त्यांना स्वतःच्या व्होट बँकेचं राजकारण संपण्याचे संकेत मिळत आहेत.पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आल्यास आम्ही एनआरसी लागू करू आणि अवैधरीत्या राहणा-या लोकांना बांगलादेशात परत पाठवू, येणारे दिवस हे कठीण आहेत. आम्ही कोणत्याही अवैध प्रवाशाला पश्चिम बंगालमध्ये सहन करणार नाही. तसेच जे लोक अवैध प्रवाशांचं समर्थन करतात, त्यांना देशातून निष्कासित केलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसारच आसाममध्ये एनआरसी लागू करण्यात आला आहे. NRCचा मुद्दा उपस्थित करणारा काँग्रेसच आता त्याला विरोध करत आहे. आम्ही देशाची सुरक्षितता आणि अखंडतेशी कोणताही समझोता करणार नाही.तत्पूर्वी आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा अंतिम मसुदा सोमवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यातील यादीत राज्यातील 2 कोटी 89 लाख रहिवाशांना नागरिकत्वासाठी योग्य मानण्यात आले आहे. तर 40 लाख रहिवाशांची नावे या मसुद्यामधून बाहेर ठेवण्यात आली आहेत.  एकूण 3 कोटी 29 लाख 91 हजार 380 रहिवाशांनी नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 2 कोटी, 89 लाख, 38 हजार 677 रहिवाशी नागरिकत्वासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले. तर सुमारे 40 लाख रहिवासी अवैधपणे वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची नावे या मसुद्यातून वगळण्यात आली आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालAssamआसाम