शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या अचूक नोंदणीसाठी देशभर ‘एनआरसी’ राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:32 IST

गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा; नागरिकांच्या नोंदणीशी धर्माचा संबंध नाही

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांची पद्धतशीर नोंदणी करून परकीय नागरिक हुडकून काढण्याची आसाममध्ये करण्यात आली तशी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’ची (एनआरसी) प्रक्रिया संपूर्ण देशात राबविण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.सदस्यांनी विचारलेले प्रश्न व उपस्थित केलेल्या पुरवणी मुद्द्यांना उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, ‘एनआरसी’चा धर्माशी काही संबंध नाही. धर्म कोणताही असला तरी जे भारतीय नागरिक आहेत त्यांची सर्वांची ‘एनआरसी’मध्ये नोंद केली जाईल. ‘एनआरसी’मध्ये धर्माच्या आधारे कोणाही नागरिकास वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेण्याची किंवा भीती बाळगण्याचे काही कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.सरकारने मांडलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि ‘एनआरसी’ या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत व त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही, यावरही त्यांनी भर दिला. पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या आधारे छळ सोसाव्या लागणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन किंवा ख्रिश्चन लोकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना भारतीय नागरिकत्व देणे सुलभ व्हावे यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यात आले आहे.आसाममध्ये ‘एनआरसी’ राबविल्यानंतर जी अंतिम यादी ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली त्यात ३.११ कोटी लोकांचे दावे मान्य करून त्यांचा भारतीय नागरिक म्हणून यादीत समावेश केला गेला. ज्यांचे दावे फेटाळले गेले किंवा ज्यांनी दावेच दाखल केले नाहीत, अशा १९.०६ लाख लोकांची नावे अंतिम यादीतून वगळली गेली होती.गृहमंत्री म्हणाले की, आसामममध्ये ज्यांची नावे ‘एनआरसी’च्या अंतिम यादीत समाविष्ट झाली नाहीत त्यांचा मार्ग बंद झालेला नाही. नाव समाविष्ट करण्यासाठी ते त्यासाठी राज्यभर स्थापन केलेल्या विशेष न्यायाधिकरणांकडे दाद मागू शकतात.ममता बॅनर्जींचा ठाम नकारकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आम्ही ‘एनआरसी’ कदापि लागू करू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.आसामनंतर आता संपूर्ण देशभर ‘एनआरसी’ राबविण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितल्यानंतर लगेचच कोलकत्यापासून सुमारे २०० कि.मी. अंतरावर सागरदिघी येथील सभेत ममता बॅनर्जी यांनी ही भूमिका जाहीर केली. त्या म्हणाल्या की, ‘एनआरसी’च्या नावाखाली बंगालमध्ये धर्माच्या आधारे फूट पाडण्याचे प्रयत्न कोणालाही करू दिले जाणार नाहीत. तुमचे भारतीय नागरिकत्व कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, अशी त्यांनी उपस्थितांना ग्वाही दिली.‘एनआरसी’चा कार्यक्रम संपूर्ण देशात हाती घेण्याआधी, आसामच्या ‘एनआरसी’ यादीतून लाखो बंगाली व हिंदूंना का व कसे वगळले गेले, याचा खुलासा भाजपने करावा, असेही बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :Amit Shahअमित शहा