शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

1985 साली राजीव गांधी यांनी केलेल्या आसाम करारामध्ये होतं तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 3:39 PM

राज्यसभेत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनआरसीचे बीज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1985 साली केलेल्या आसाम अॅकॉर्डमध्ये असल्याचे सांगितले. काँग्रेस जे करु शकले नाही ते आता आम्ही करत आहोत असे त्यांनी यावेळेस सांगितले. त्यामुळे आसाम करार नक्की काय होता याची माहिती असणे आवश्यक आहे.

मुंबई- राष्ट्रीय नागरिकत्व मसुदा आसाममध्ये प्रकाशित झाल्यानंतर देशभरामध्ये त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. बांगलादेशातून आणि म्यानमारमधून भारतात घुसलेल्या लोकांचं करायचं काय यावर मते मांडली जात आहेत. 13 वर्षांपूर्वी बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे असे म्हणणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आता अचानक आपली भूमिका पूर्णपणे बदलली आहे. एनआरसीवर टीका करत सरकारविरोधी भूमिका घेत त्या एकापाठोपाठ एक विधाने करत सुटल्या आहेत. भारतामध्ये गृहयुद्ध पेटेल, रक्ताचे पाट वाहतील अशी भाषा त्या वापरु लागल्या आहेत.परवा राज्यसभेत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनआरसीचे बीज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1985 साली केलेल्या आसाम अॅकॉर्डमध्ये असल्याचे सांगितले. काँग्रेस जे करु शकले नाही ते आता आम्ही करत आहोत असे त्यांनी यावेळेस सांगितले. त्यामुळे आसाम करार नक्की काय होता याची माहिती असणे आवश्यक आहे.

1970 च्या दशकाच्या शेवटी खासदार हिरालाल पटवारी यांच्या निधनामुळे आसामच्या मांगलडोई मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी त्याआधीच्या निवडणुकीपेक्षा अचानक मतदारांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. बांगलादेशातून हजारो लोकांनी घुसखोरी करुन मतदार यादीत प्रवेश मिळाल्याचे दिसताच ऑल आसाम स्टुडंट युनियन म्हणजे आसूने 8 जून 1979 रोजी 12 तासांचा संप घडवून आणला. या सर्व बाहेरच्या लोकांना पकडून देशाबाहेर हाकलावे अशी मागणी त्यांनी केली होती. आसाममध्ये घुसखोरांविरोधात पेटलेली ठिणगी आजही प्रज्वलितच आहे. आसाममध्ये 1979 पर्यंत घुसखोरांचा मुद्दा फारसा राजकीय पटलावर आलाच नाही. मात्र त्यानंतर याप्रश्नाला तोंड फुटले. यावर्षीच्या आंदोलनामुळेच आसाम गण परिषद निर्माण झाली.1980 ते 82 या कालावधीत केंद्र सरकारबरोबर आसामातील आंदोलकांच्या चर्चेच्या 23 फेऱ्या झाल्या. या चर्चांमध्ये 1951 ते 1961 या कालावधीत आलेल्या लोकांना सामावून घेणे आणि 1971 नंतर भारतात घुसलेल्या लोकांना परत पाठवण्यावर एकमत झाले. मात्र 1961 ते 1971 या कालावधीत आलेल्या लोकांचे काय करायचे याचा निर्णय झाला नाही.

1984मध्ये या दोन्हींमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. 15 ऑगस्ट 1985 रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम समझोत्यावर स्वाक्षरी केली. मार्च 1971 नंतर आलेल्या प्रत्येक घुसखोराला परत पाठवण्याचे त्यामध्ये निश्चित झाले व आसाममध्ये नव्या मतदारयादीनुसार 1985 साली निवडणुका घेण्यात आल्या.

आसाम समझोता काय आहे?1 जानेवारी 1966 पासून 24 मार्च 1971 पर्यंत आलेल्या परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांचे मतदार यादीतील नाव काढून टाकण्यात येईल आणि त्यांना 10 वर्षे मताधिकारापासून वंचित ठेवण्यात येईल; 25 मार्च 1971 नंतर आलेल्या परदेशी नागरिकांना भारताबाहेर पाठविण्यात येईल; असे निश्चित केले गेले. या करारामुळे आसामातील अशांतता कमी झाली आणि आंदोलन शमले. 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीAssam Gana Parishadअसाम गण परिषद