Sadhvi Ritambhara speech: तरुणी आणि महिलांबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्धाचार्य आणि प्रेमानंद महाराज यांची विधाने चर्चेत आहेत. यावरून वाद सुरू असतानाच साध्वी ऋतंभरा यांनीही यावर एक विधान केलं आहे. ज्यामुळे वाद उभा राहिला आहे. हल्ली हिंदू मुली नग्न होऊन पैसे कमावत आहे. अश्लील नाच करून पैसे कमावले जात आहेत, असे साध्वी ऋतंभरा म्हणाल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका प्रवचनादरम्यान बोलताना साध्वी ऋतंभरा यांनी हिंदू तरुणी, महिलांच्या वर्तनावर टीका केली.
साध्वी ऋतंभरा रील बनवणाऱ्या तरुणींबद्दल काय म्हणाल्या?
"हिंदू तरुणींना बघून लाज वाटते. त्या नाच करून, घाणेरडी गाणी गाऊन पैसे कमावले जात आहेत. त्यांचे पती आणि वडिलही पैसे मिळत असल्यामुळे त्यांना काहीही बोलत नाहीयेत. घरात वाईट कमाई येते, त्यामुळे आपल्या पूर्वजांचे आत्मे तडफडू लागतात", असे साध्वी ऋतंभरा यांनी म्हटले.
साध्वी ऋतंभरा यांनी रील बनवणाऱ्या तरुणी आणि महिलांवर टीका केली. त्या म्हणाल्या, "रीलसाठी अश्लील नाचतात. घाणेरडी गाणी आणि इतक काय तर कमीत कमी कपडे घालून रील बनवले जात आहेत. हिंदू तरुणी नग्न होऊन पैसे मिळवत आहेत."
प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्या विधानावरून वाद
काही दिवसापूर्वी अनिरुद्धाचार्य आणि प्रेमानंद जी महाराज यांनीही महिला, तरुणींबद्दल अशाच आशयाचे विधान केले होते. दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिप चुकीचे असल्याचे सांगत तरुणींच्या चारित्र्याबद्दल बोलले होते.
आजकालच्या मुली लग्नापूर्वीच संबंध ठेवतात. त्यामुळे त्या पवित्र राहत नाहीत. जी मुलगी लग्नापूर्वी संबंध ठेवते, ती आपल्या पतीसोबत किंवा सासरच्या लोकांसोबत प्रामाणिक कशी राहू शकते? असे दोघेही म्हणाले होते.