शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

आता आपण कोर्टातच भेटू, शमीनं रुग्णालयात आलेल्या हसीनची भेट नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 8:44 PM

जिच्यामुळे शमी वादात सापडला होता ती हसीन जहाँनही त्याच्या भेटीसाठी गेली होती. परंतु शमीनं तिची भेट नाकारल्याची माहिती खुद्द त्याची पत्नी हसीन जहाँनने दिली आहे.

नवी दिल्ली- भारताचा सध्याच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारला रविवारी पहाटे अपघात झाला. डेहराडूनहून दिल्लीकडे येत असताना एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी होऊन त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर जिच्यामुळे शमी वादात सापडला होता ती हसीन जहाँनही त्याच्या भेटीसाठी गेली होती. परंतु शमीनं तिची भेट नाकारल्याची माहिती खुद्द त्याची पत्नी हसीन जहाँनने दिली आहे.ती म्हणाली, मी आज माझ्या पती शमीला भेटण्यास गेले होते. परंतु त्यानं मला भेटण्यास नकार देऊन कोर्टात भेटू, अशी धमकी दिली. त्यानं माझ्या मुलीची भेट घेऊन तिच्याशी खेळलासुद्धा, मात्र त्यानं माझी भेट नाकारली. तसेच त्याची आई शमीची बॉडीगार्ड असल्यासारखी माझ्यासोबत वागली. हसीननं शमीनं भेट नाकारल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.  पत्नीबरोबर झालेल्या मतभेदांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मोहम्मद शमी क्रिकेट अकादमीच्या कामासाठी डेहराडून येथे आला होता. तिथूनच पहाटे तो नवी दिल्लीत परतत असताना त्याच्या गाडीला अपघात झाला. दिल्लीला येत असताना रस्त्यात एका भरधाव ट्रकने शमीच्या कारला धडक दिली. या अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला 10 टाके पडले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीAccidentअपघात