आता तरी जुन्या-जाणत्या नेत्यांचा तुम्ही सल्ला घ्या -  शत्रुघ्न सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:08 IST2018-06-08T00:08:48+5:302018-06-08T00:08:48+5:30

भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षावर पुन्हा एकवार टीका करताना, आता तरी तुम्ही जुने, जाणते व ज्ञानी नेत्यांचे सहकार्य घ्या, असा सल्ला दिला आहे.

 Now you should consult the old-time leaders - Shatrughan Sinha | आता तरी जुन्या-जाणत्या नेत्यांचा तुम्ही सल्ला घ्या -  शत्रुघ्न सिन्हा

आता तरी जुन्या-जाणत्या नेत्यांचा तुम्ही सल्ला घ्या -  शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली : भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षावर पुन्हा एकवार टीका करताना, आता तरी तुम्ही जुने, जाणते व ज्ञानी नेत्यांचे सहकार्य घ्या, असा सल्ला दिला आहे. मोदी यांना त्यांचे सल्लागार योग्य माहिती व वस्तुस्थिती सांगत नाहीत, असेही त्यांनी ट्विट करून म्हटले आहे. कोणीही कायम अजिंक्य असत नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, अरूण शौरी यासारख्या जुन्या व ज्ञानी नेत्यांचे सहकार्य घेण्याची वेळ तुमच्यावर आला आली आहे, असे सुचवितानाच काही नेते तुम्हाला वस्तुस्थिती सांगतच नाहीत, असा आरोपही खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे.

उसे भुला नही कहते
‘सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए, तो उसे भूला नहीं कहते’ या हिंदीतील ओळींचा उल्लेख करून खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी कोणीही कायम अजिंक्य राहू शकत नाही, असे सुनावले आहे.

Web Title:  Now you should consult the old-time leaders - Shatrughan Sinha