शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 06:08 IST

वाढते प्रदूषण, इंधनाचे प्रचंड दर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन भोपाळ येथील विद्यार्थ्यांनी एक नवा प्रयोग साकारला आहे.

भोपाळ : वाढते प्रदूषण, इंधनाचे प्रचंड दर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन भोपाळ येथील विद्यार्थ्यांनी एक नवा प्रयोग साकारला आहे. मॅनेजमेंट अँड सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयएसटी) विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘ई-बुलेट’ या वाहनाची निर्मिती केली आहे.

‘ई-बुलेट’वर सोलर पॅनल बसवले असून, सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. या बॅटरीमधील ऊर्जेवर वाहन चालते. तसेच, या वाहनासाठी कंट्रोलर युनिट, लिथियम-आयर्न बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. सध्या तीनचाकी वाहनांवरच सोलर पॅनल बसविण्यात येत आहे. 

वाहनक्षेत्रात मोठी क्रांती स्टुडंट्स वेल्फेअर विभागाचे डीन प्रा. शैलेंद्र जैन यांनी सांगितले की, ई-बुलेटचा प्रयोग यशस्वी ठरल्यास वाहनक्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते. त्यामुळे वाहनक्षेत्रात सौरऊर्जेचा वापर वाढू शकेल.

नेमके काय होते? सोलर पॅनल : वाहनावर लावलेली पॅनल वीज तयार करतात.कंट्रोलर युनिट : सोलर ऊर्जेची योग्यरीत्या साठवणूक करून ती बॅटरीत पाठवते.लिथियम-आयर्न बॅटरी : ऊर्जा साठवून गरजेनुसार वाहनाला पुरवते. इलेक्ट्रिक मोटर : बॅटरीतील ऊर्जेच्या साहाय्याने वाहनाला गती देते.

असे आहेत सौरऊर्जेचे आणखी फायदेसौरऊर्जेमुळे वाहन चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल किंवा विजेवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांना त्याचा अधिक फायदा आहे. सोलर चार्जिंगमुळे इलेक्ट्रिकल चार्जिंगवरील खर्च वाचतो.पॅनलमध्ये मोठे यांत्रिक भाग नसल्याने देखभाल कमी लागते. ही पॅनल २० ते २५ वर्षांपर्यंत कार्यक्षम राहू शकतात. जिथे वीज उपलब्ध नाही अशा ग्रामीण किंवा डोंगराळ भागांत सौरऊर्जेचा वापर वाहनासाठी करता येईल. सोलार पॅनलद्वारे एसी, रेडिओ, लाइट्स, कूलिंग फॅन्स यांसारख्या सप्लिमेंटरी सिस्टम्सना ऊर्जा पुरविता येते. यात सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी आगामी काळात खर्चात मोठी बचत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Solar-powered E-Bullet arrives: Energy saving, pollution control benefits.

Web Summary : Bhopal students created a solar-powered 'E-Bullet' to combat pollution and rising fuel costs. Solar panels charge a battery that powers the vehicle using lithium-ion batteries and electric motors. It reduces reliance on traditional fuels, offering long-term savings and rural accessibility.
टॅग्स :bikeबाईकMadhya Pradeshमध्य प्रदेश