आता ‘खर्च करा आणि जगा’, नाही तर ‘बचत करा आणि प्रगती करा’ हाच ‘जेन-झी’चा मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:14 IST2026-02-20T11:13:03+5:302026-02-20T11:14:58+5:30

फेडरल व मॅकिन्सेच्या अलीकडील अहवालानुसार, आर्थिक अनिश्चितता, वाढती महागाई आणि जॉब मार्केटमधील अस्थिरतेमुळे ही पिढी आता ‘स्मार्ट कंझ्युमर’ बनली आहे. ही पिढी संपत्तीनिर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

Now, the mantra of 'Gen-Z' is not 'Spend and Live', but 'Save and Grow'! | आता ‘खर्च करा आणि जगा’, नाही तर ‘बचत करा आणि प्रगती करा’ हाच ‘जेन-झी’चा मंत्र!

आता ‘खर्च करा आणि जगा’, नाही तर ‘बचत करा आणि प्रगती करा’ हाच ‘जेन-झी’चा मंत्र!

नवी दिल्ली : नव्या पिढीची म्हणजेच ‘जेन-झी’ची उपभोग घेण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. जुन्या पिढ्या ‘खर्च करा व जगा’ या तत्त्वावर चालत होत्या, तिथे नवी पिढी आता विचारपूर्वक, गरजेनुसार खर्च करण्यावर भर देत आहे.

   फेडरल व मॅकिन्सेच्या अलीकडील अहवालानुसार, आर्थिक अनिश्चितता, वाढती महागाई आणि जॉब मार्केटमधील अस्थिरतेमुळे ही पिढी आता ‘स्मार्ट कंझ्युमर’ बनली आहे. ही पिढी संपत्तीनिर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

डिजिटल प्रभाव व नियंत्रित खर्च

डिजिटल युगात वाढलेली ही पिढी ‘इन्स्टंट बाय’ऐवजी ‘रिसर्च-अँड-बाय’ संस्कृतीचा वापर करत आहे. खरेदी करण्यापूर्वी ते सखोल संशोधन, रिव्ह्यू आणि प्राइस ट्रॅकिंगचा वापर करतात. भारतातील शहरी भागातील तरुण भाड्याने मिळणाऱ्या सेवांकडे वळत आहेत.

दिखाव्यापासून दूर, खर्चात कपात

विचार न करता खर्च करण्याची प्रवृत्ती जेन-झीमध्ये कमी झाली आहे.

सोशल मीडियाच्या प्रभावापेक्षा ते वस्तूची किंमत, गुणवत्ता, उपयोगिता तपासतात.

ही पिढी डिस्काउंट, सेकंड-हँड वस्तू, स्वस्त पर्यायांना पसंती देत आहे.

नवीन कौशल्ये शिकण्याला ते जास्त महत्त्व देतात.

भारतीय तरुण कुठे खर्च करतात?

८५% जेन-झी अशा श्रेण्यांमध्ये खर्च करण्यास तयार आहेत, जिथे त्यांना योग्य मूल्य मिळते.

३४%तरुणांचे कपड्यांवर खर्च करण्यास प्राधान्य.

२९% तरुण सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करण्यास प्राधान्य देतात.

 

Web Title : जेन-ज़ी: खर्च से ज़्यादा बचत और प्रगति को प्राथमिकता

Web Summary : आर्थिक अनिश्चितता के कारण जेन-ज़ी अब सोच-समझकर खर्च कर रही है। वे अनुसंधान, मूल्य और छूट को प्राथमिकता देते हैं, कौशल विकास और संपत्ति निर्माण पर ध्यान केंद्रित करते हैं। कपड़े और सौंदर्य उत्पाद लोकप्रिय खर्च श्रेणियां हैं।

Web Title : Gen-Z prioritizes saving and progress over spending: Report.

Web Summary : Gen-Z shifts from impulsive spending to smart consumption, driven by economic uncertainty. They prioritize research, value, and discounts, focusing on skill development and wealth creation. Clothing and beauty products remain popular spending categories.