शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 01:48 IST

नेहा हिरेमठच्या हत्येसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, व्होट बँकेचे भूकेले सरकार लोकांना संरक्षण देऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नगरसेवकाची ही मुलगी हुबळी येथील महाविद्यालयात एमसीएला शिकत होती.

कर्नाटकातकाँग्रेसच्या नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा मुद्दा लोकसभा निवडणुकीतही गाजताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बेल्लारी येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी या प्रकरणावरून काँग्रेस सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. "काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळेच हुबळी येथील महाविद्यालयात नेहाची हत्या झाली. काँग्रेस सरकारमुळेच बेंगलोरमध्ये स्फोट झाला. काँग्रेस सरकार तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी प्रचंड घसरले आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नेहा हिरेमठच्या हत्येसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, व्होट बँकेचे भूकेले सरकार लोकांना संरक्षण देऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नगरसेवकाची ही मुलगी हुबळी येथील महाविद्यालयात एमसीएला शिकत होती. तीची फैजल नामक युवकाने हत्या केली. यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारमध्ये मुली सुरक्षित नाही. हुबळी येथील महाविद्यालत दिवसा ढवल्या एका मुलीची हत्या केली गेली. हत्येसारख्या घटनांमध्ये सामील असलेल्या लोकांनाही येथे भीती वाटत नाही. संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हा काँग्रेसच्या धोरणाचा परिणाम आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसची मानसिकता राज्य आणि देशासाठी घातक आहे. व्होट बँकेसाठी गुन्हेगारी आणि दहशतवादाशी तडजोड होऊ शकत नाही. मात्र, काँग्रेस काहीही शिकायला तयार नाही. ती व्होटबँकेसाठी लोकांना दहशतवाद आणि गुन्हेगारीच्या खाईत ढकलायलाही तयार आहे, असेही मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी बंदी घातलेल्या पीएफआय या संघटनेसंदर्भातही  काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसKarnatakकर्नाटकBJPभाजपाLove Jihadलव्ह जिहादNarendra Modiनरेंद्र मोदी