मन की बात करणा-या पंतप्रधानांचे आता मौन व्रत - सोनिया गांधी

By Admin | Published: August 3, 2015 11:20 AM2015-08-03T11:20:48+5:302015-08-03T14:26:40+5:30

मन की बात करणारे पंतप्रधान त्यांच्या सहका-यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मौन व्रत धारण करतात अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.

Now the silent vow of the Prime Minister talking about the mind - Sonia Gandhi | मन की बात करणा-या पंतप्रधानांचे आता मौन व्रत - सोनिया गांधी

मन की बात करणा-या पंतप्रधानांचे आता मौन व्रत - सोनिया गांधी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - मन की बात करणारे पंतप्रधान त्यांच्या सहका-यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मौन व्रत धारण करतात अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.  सरकार जबाबदारीने वागण्याऐवजी संख्याबळाचा वापर करत अहंकार दाखवत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

सोमवारी काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आधी चर्चा मग कारवाई या मोदी सरकारच्या आम्ही निषेध करतो असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. ठोस पुराव्यांच्या आधारे काँग्रेस महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत असून सरकार या प्रकरणातील संबंधीतांवर कारवाई करण्यास अनुत्सूक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Now the silent vow of the Prime Minister talking about the mind - Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.