आता 'या' लोकांना मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:01 IST2021-11-24T15:59:28+5:302021-11-24T16:01:52+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आता 'या' लोकांना मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय
नवी दिल्ली: कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला(PM Garib Kalyan Anna Yojana) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील. मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा ताण कमी करणे हा आहे.
सुरुवातीला, ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा(NFSA) अंतर्गत 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना सरकार मोफत रेशन पुरवते. मोफत शिधापत्रिकाधारक शिधावाटप दुकानांमधून मिळणाऱ्या अनुदानित धान्यापेक्षा जास्त आहेत.
योजनेचा लाभ कोणाला आणि किती मिळतो?
केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत, भारतातील सुमारे 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना दरमहा 5 किलो अधिक धान्य(गहू-तांदूळ) दिले जाते. देशातील ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 5 किलो अतिरिक्त रेशन त्याच्या कोट्यातील रेशनसह मिळत आहे. पण, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
योजनेचा लाभ न मिळाल्यास तक्रार करू शकता
जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि रेशन विक्रेते या योजनेअंतर्गत तुमच्या कोट्यात धान्य देण्यास नकार देत असतील तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल वर प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही NFSA वेबसाइट https://nfsa.gov.in वर जाऊन मेल लिहून तक्रार नोंदवू शकता.