शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेस कोड, पुरुष धोतर, तर महिला नेसणार साडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:15 AM

उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे.

वाराणसीः उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. महाकालच्या मंदिरात बाबा विश्वनाथांना अभिषेक आणि स्पर्श करण्यासाठी भाविकांना धोतर (न शिवलेलं वस्त्र) परिधान करणं अनिवार्य असेल. तर मंदिरात आलेल्या महिला भाविकांनी साडी नेसणं सक्तीचं केलं आहे. महिलांनी साडी नेसलेली असल्यासच त्यांना बाबा विश्वनाथांना अभिषेक आणि स्पर्श करता येईल. मकर संक्रांतीनंतर या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पँट, शर्ट, जिन्स, सूट परिधान केलेल्या भाविकांना फक्त बाबांचे लांबून दर्शन करता येणार आहे. बाबा विश्वनाथाचं स्पर्शदर्शन भाविकांना मंगला आरतीपासून मध्यान्ह आरतीपर्यंत मिळणार आहे. मकर संक्रांतीनंतर नवी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. रविवारी मंदिर प्रशासन आणि काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काशी विद्वत परिषदेच्या सदस्यांनी स्पर्श दर्शन व्यवस्था आणखी सुस्थितीत आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच विद्वत परिषदेच्या सदस्यांनी उज्जैनमधील महाकाल ज्योतिर्लिंग, रामेश्वरम आणि सबरीमाला मंदिराचं उदाहरण दिलं आहे. महाकालच्या भस्म आरतीच्या वेळी बाबा स्पर्श करण्यासाठी न शिवलेलं वस्त्र परिधान करतात. इतर भाविक फक्त दर्शन आणि पूजन करतो. श्री काशी विश्वनाथ मंदिरातही ही नवी व्यवस्था लागू केली पाहिजे, असाही विद्वत परिषदेच्या सदस्यांनी सूचना केली आहे.