शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता काँग्रेस राजस्थानात वापरणार भाजपचं गुजरात मॉडेल? मुख्यमंत्री अशोक गेहलोतांना देण्यात आलाय फ्रीहॅन्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 13:50 IST

राजस्थानातील काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, गेहलोत सध्या फ्रंटफूटवर खेळत आहेत.

या वर्षाच्या अखेरीस राजस्थानात विधानसभा निवडणूक होत आहे. भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने (भाजप) राजस्थानात पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. तर काँग्रेसही पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लागली आहे. दोन्ही पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 

राजस्थानातील काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, गेहलोत सध्या फ्रंटफूटवर खेळत आहेत. काँग्रेस हायकमांडने राजस्थान निवडणुकीसाठी गेहलोत यांना फ्रीहॅन्ड दिला आहे. अर्थात राजस्थान विधानसभा निवडणुकीशी संबंधित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य गेहलोत यांना देण्यात आले आहे. अशा स्थितीत राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपचे गुजरात निवडणूक मॉडेलचा वापर करू शखते, असे बोलले जात आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली होती. यानंतर आलेला निकाल धक्कादायक होता. गेल्या वर्षीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून इतिहास रचला होता.

काय होते भाजपचे गुजरात निवडणूक मॉडेल -गुजरातमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत भाजपला 156 जागा मिळाल्या होत्या. यादरम्यान भाजपने गुजरातमधील आपल्या अनेक विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले होते. आता राजस्थानात अशोक गेहलोत सरकार हेच मॉडेल वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचे काही राजकीय जाणकारांचे मत आहे. यामुळे राजस्थानातही अनेक विद्यमान आमदारांची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे.

अनेक आमदारांची तिकिटं कापण्याचे संकेत -राजस्थानात डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी गेहलोत आपल्या अनेक आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेहलोत यांनी यापूर्वी एक सर्वेक्षण  केले होते. यात काही आमदारांना चांगले नंबर्स मिळाले नाहीत. यानंतर, गेहलोतांनी राजस्थानची जनता काही आमदारांच्या कामावर समाधानी नसल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे या काही आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते. यात 60 ते 70 आमदारांचा नंबर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा