शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

"...आता काँग्रेस अमित शाहांच्या व्हिडीओतून भ्रम पसरवताहेत"; तावडेंचे टीकास्त्र, शेअर केला पूर्ण व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:22 IST

Amit Shah Video Congress: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसने टीका केली. काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी उत्तर दिले. 

"आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर म्हणण्याची आता एक फॅशन झाली आहे. इतकं नाव ईश्वराचं घेतलं असतं, तर सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता", असे विधान करतानाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडले. अमित शाहांनी आंबेडकरांचा अवमान केल्याचे म्हणत काँग्रेस आणि विरोधकांनी संसदेत आणि विधिमंडळातही निषेध केला. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपाला आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उत्तर दिले. तावडे यांनी काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ आणि पूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या विधानाचे पडसाद उमटले. विरोधकांनी संसदेत आणि विधिमंडळात निषेध केला. भाजपला आंबेडकरविरोधी ठरवत विरोधकांनी हल्ला चढवला. विरोधकांच्या टीकेला तावडे यांनी अमित शाह यांच्या विधानाचा पूर्ण व्हिडीओ शेअर करत उत्तर दिले आहे. 

विनोद तावडेंनी काँग्रेसला काय उत्तर दिले?

काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ आणि विधानाचा पूर्ण व्हिडीओ शेअर करत विनोद तावडे म्हणाले, "काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर विरोधी पक्ष राहिला आहे आणि आता गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडीओ काटछाट करून भ्रम पसरवण्याचे प्रयत्न करत आहे."

"इतिहास साक्षी आहे की काँग्रेसच्या धोरणांमुळे नाराज होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. काँग्रेस सुरूवातीपासूनच बाबासाहेबांचा विरोध करत राहिली आहे आणि आता फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे", असे प्रत्युत्तर विनोद तावडे यांनी काँग्रेसला दिले.  

अमित शाहांनी देशाची माफी मागायला हवी, काँग्रेसची मागणी

राज्यसभेत उत्तर देताना अमित शाह यांनी केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. काँग्रेसने शाहांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, "अमित शाह खूप वाईट बोलले आहेत. त्यातून हे दिसते की, भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप द्वेष आहे."

"इतका द्वेष की त्यांच्या नावाचाही यांना राग येतो. हे तेच लोक आहेत, ज्यांच्या पूर्वजांनी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळले आहेत. जे स्वतः बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची गोष्ट करतात. जेव्हा जनतेने यांना धडा शिकवला, तर यांना बाबासाहेबांचं नाव घेण्याबद्दल राग येत आहे. लाजिरवाणं आहे. अमित शाहांनी यासाठी देशाची माफी मागायला हवी", असे काँग्रेसने म्हटले. 

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहVinod Tawdeविनोद तावडेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी