आता लसीकरणावरून केंद्र-राज्यात जुंपली, प्रकाश जावडेकर यांचे आरोप टोपे यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:31 AM2021-03-18T05:31:12+5:302021-03-18T07:19:20+5:30

केंद्राने महाराष्ट्राला ५४ लाख डोस दिले होते. पण राज्यात ५६ टक्के साठा वापरलाच गेलेला नाही. इतकी लस शिल्लक असूनही शिवसेनेचे खासदार आणखी लस हवी अशी मागणी करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्राने गडबड गोंधळ केला.

Now the center-state clash over vaccination | आता लसीकरणावरून केंद्र-राज्यात जुंपली, प्रकाश जावडेकर यांचे आरोप टोपे यांनी फेटाळले

आता लसीकरणावरून केंद्र-राज्यात जुंपली, प्रकाश जावडेकर यांचे आरोप टोपे यांनी फेटाळले

Next


नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना आता लसीकरणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ 
टक्के लसीचे लसीकरण झाले असून ५६ टक्के लस पडून राहिली असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केला. हा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावला. (Now the center-state clash over vaccination)

केंद्राने महाराष्ट्राला ५४ लाख डोस दिले होते. पण राज्यात ५६ टक्के साठा वापरलाच गेलेला नाही. इतकी लस शिल्लक असूनही शिवसेनेचे खासदार आणखी लस हवी अशी मागणी करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्राने गडबड गोंधळ केला. आता लसीकरणाबाबतही तेच घडत आहे असा आरोप जावडेकर यांनी केला.
महाराष्ट्राला १८ मार्च पर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२ लाख ७४ हजार डोस मिळणार आहेत. लसीचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचे राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

१० दिवस पुरेल एवढाच साठा
राज्य शासनाला केंद्राकडून मिळत असलेल्या कोरोना लसींचा पुरेपूर वापर केला जात आहे. दररोज तीन लाख लसी देण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी आठवड्याला २० लाख लसींचा पुरवठा करावा. १ कोटी ९७ लाख लोकांचे लसीकरण तीन महिन्यांत करायचे आहे. तीन लाखाच्या दररोजच्या लसीकरणाच्या कार्यक्रमानुसार फक्त दहा दिवसांचा स्टॉक उपलब्ध आहे.
  - राजेश टोपे, आरोग्यमंत्री
 

Web Title: Now the center-state clash over vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.