शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अब की बार ३०० पार, मोदींच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये विरोधक भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:43 IST

भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला. पाच वर्षांपूर्वी आलेली मोदी लाट जराही न ओसरता उलट जबरदस्त त्सुनामी होऊन धडकली व तिच्या तडाख्याने सत्ताकांक्षेने एकवटलेले सारे विरोधक पार चितपट झाले. या त्सुनामीवर आरुढ होत भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने न भूतो असा विजय मिळवत दिल्लीच्या सिंहासनावरील मांड अधिक भक्कम केली. एकट्या भाजपने ३०३ जागांचा पल्ला गाठत १७ व्या लोकसभेतील ‘रालोआ’चे संख्याबळ ३५०च्या जवळ नेले.‘मोदी हटाव’ असा एककलमी कार्यक्रम घेत ‘चौकीदार चोर है’, असा घोषा लावलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली. गेल्या लोकसभेत ४४ असा निचांक गाठलेल्या काँग्रेसची यावेळी जेमतेम ५० पार करताना दमछाक झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ व इतरांचे ‘महागठबंधन’ या विरोधकांच्या दोन्ही आघाड्या प्रत्येकी शतकही गाठू सकल्या नाहीत.सलग पाच वर्षे सत्तेवर राहूनही मतदारांची फेरपसंती मिळविण्याची किमया मोदी-अमित शहा या जादुई जोडीने करून दाखविली. यावेळी भाजपाला मिळालेली सुमारे ४५ टक्के मते हा या पक्षास गेल्या ३९ वर्षांत मिळालेला सर्वात मोठा जनाधारठरला. यासाठी या दोघांनी अनुक्रमे सरकारच्या व पक्षाच्या पातळीवर अपार मेहनत घेतली.स्वत: मोदी यांनी १४२ प्रचारसभा घेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने केलेले प्रहार, सर्जिकल स्ट्राईकचा हवाला देत जागविलेला राष्ट्रवाद व कोट्यवधी कुटुंबांना नवी आशा देणाऱ्या अनेक कल्याणकारी योजना यांनी हे घवघवीत यश मिळवून दिले. या योजनांनी व मोदींच्या करिष्म्याने तब्बल २७ राज्यांमधील मतदारांवर गारुड केले. ‘गरिबी हटाओ’चा नारा देत इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत ३५१ जागा जिंकल्या होत्या त्याचीच ही जणू दुसरी आवृत्ती होती.>लाटेत आले अन् भूईसपाट झाले...मोदींची ही त्सुनामी एवढी जबरदस्तहोती की, बिहार, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र, आसाम व संपूर्ण ईशान्य भारतात काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष पुरते भूईसपाट झाले. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थानमध्येही काँग्रेसचा धुुव्वा उडाला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विधानसभेची माळ काँग्रेसच्या गळ््यात घालणाºया मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्येही तेच चित्र दिसले. कर्नाटकमध्येही काँग्रेसच्या दारुण पराभवासह मल्लिकार्जून खारगे व वीरप्पा मोईली यांच्यासारख्या त्यांच्या दिग्गज नेत्यांचाही या लाटेत टिकाव लागला नाही. एकट्या पंजाबने काँग्रेसची लाज राखली.

----------सरकारसमोर आव्हाने- एस. के. गुप्तानोटबंदीमुळे ३५ लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले. मतदारांच्या मनातील बेरोजगारीचे भय दूर करण्याच्यादृष्टीने ठोस पावले उचलावी लागतील.जीएसटी सुलभ करण्याचा वायदा मोदी सरकारने निवडणुकीत केला होता. हा वायदा सरकार पूर्ण करील, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी निधी वाढवावा लागेल. पदवीसोबतच कौशल्य विकासावर लक्ष द्यावे लागेल.बहुमत असलेले स्थिर सरकार आल्यास थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघही वाढतो. तथापि, नवीन मंत्रिमंडळ कसे असेल, यावर हे अवलंबून असेल.देशाची अर्थव्यवस्था व सुरक्षा भक्कम करण्यासाठी चांगल्या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाBJPभाजपा