आता अमरण उपोषण
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:45+5:302015-02-14T23:51:45+5:30
भोकर : मजुराला डावलून मशिनद्वारे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम होत असल्याबाबत दोन वेळा तक्रार करुन सुद्धा या कामाची अद्याप पर्यंत चौकशी न झाल्याने हाडोळीच्या ग्रामस्थांनी १६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.

आता अमरण उपोषण
भ कर : मजुराला डावलून मशिनद्वारे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम होत असल्याबाबत दोन वेळा तक्रार करुन सुद्धा या कामाची अद्याप पर्यंत चौकशी न झाल्याने हाडोळीच्या ग्रामस्थांनी १६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून हाडोळी येथे माती नाला बांधव बांधण्यात येत आहे. हाडोळी येथे माती नाला बांध बांधण्यात येत आहे. या कामाच्या सुरुवातीला मजूर लावण्यात आले पण नंतर या मजुरांना डावलून मशिनद्वारे काम करण्यात येत असून या कामाची चौकशी व्हावी म्हणून यापूर्वी २७ जानेवारी आणि ६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाकडे अर्ज केले होते. पण या कामाची चौकशी न झाल्याने १६ फेब्रुवारी पासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनावर लक्ष्मण चिलेमोड, शंकरराव मिराशे, सयाजी जंगेवाड, शंकर चरकेवाड, दत्ता फुलारी, राजेश लोलुपवार, सुरेश वाघमारे यासह २८ जणांच्या संख्या आहेत.आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावाभोकर : येथील शाहू विद्यालयातील १९८७ च्या दहावी वर्गातील विद्यार्थ्याचा आज १५ फेब्रुवारी रोजी मेळावा होणार आहे.सकाळी ९ ते १ पर्यंत विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन दुपारी १ वाजता मेळाव्याचे उद्घाटक म्हणून माजी आ. बापुसाहेब देशमुख, अध्यक्ष ॲड. गोविंदराव लामकाणीकर, प्रमुख पाहुणे म्हणून एन.डी. तुप्तेवार, एस.ए. कुलकर्णी, एन.पी. जोशी, डॉ. सुरेश सावंत, देविदास फुलारी, जी.पी. देवराये यांची उपस्थिती राहणार आहे. (वार्ताहर)