शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:13 IST

Saqib Nachan Death: बॉम्बस्फोटांसह अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला कुख्यात दहशतवादी साकिब नाचन याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तिहार कारागृहामध्ये कैदेत असलेल्या साकिब नाचन याला प्रकृती बिघडल्याने उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे ब्रेनस्ट्रोक आल्याने नाचन याचा मृत्यू झाला.

बॉम्बस्फोटांसह अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला कुख्यात दहशतवादी साकिब नाचन याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तिहार कारागृहामध्ये कैदेत असलेल्या साकिब नाचन याला प्रकृती बिघडल्याने उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे ब्रेनस्ट्रोक आल्याने नाचन याचा मृत्यू झाला. भारत सरकारने बंदी घातलेल्या सिमी या संघटनेचा साकिब नाचन हा माजी प्रमुख होता. तसेच सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलेल्या मुंबईजवळच्या आयएसआयएसच्या पडघा मॉड्युलमधील तो प्रमुख आरोपी होता.

गेल्या काही काळापासून साकिब नाचन हा दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये न्यायालयीन कोठडीत होता. सोमवारी प्रकृती बिघडल्याने त्याला दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान प्रकृती अधिकच बिघडून त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साकिब नाचन याचा मृत्यू बुधवारी झाला होता. मात्र याची अधिकृत घोषणा उशिरा करण्यात आली. नाचन याची प्रकृती सातत्याने खालावत होती. तसेच ब्रेनस्ट्रोकमुळे त्याच्या शरीराने प्रतिक्रिया देणं बंद केलं होतं. मालेगाव आणि  मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये साकिब नाचन याचं नावा समोर आलं होतं. मात्र काही प्रकरणातून त्याची मुक्तता झाली होती.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार साकिब नाचन याची आयएसआयएसशीसंबंधित दहशतवाद्यांच्या केलेल्या मदतीच्या आरोपाखाली चौकशी सुरू होती. त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी काद्यांतर्गत गुन्हे नोंद झाले होते. तसेच दिल्ली-पडघा आयएसआयएस मॉड्युलचा साकिब नाचन हा प्रमुख भाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच साकिब नाचन हा दहशतवाद्यांना आर्थिक आणि इतर मदत करायचा असेही तपासामधून समोर आले होते.  

टॅग्स :terroristदहशतवादीMumbaiमुंबईdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी