कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:00 IST2025-05-29T16:59:09+5:302025-05-29T17:00:38+5:30

या कारवाईदरम्यान डिव्हीएफ टीमने कुंजम हिडमा नावाच्या कट्टर नक्षलवाद्याला यशस्वीरित्या अटक केली.

Notorious Naxalite Kunjam Hidma arrested; Large cache of weapons including AK-47 seized | कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त

कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त

Naxalite Hidma Arrested: नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमा याला आज(दि.29) अखेर अटक केले. त्याच्याकडून एके-47 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजम हिडमा याला ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील बैपारीगुडा पोलिसांनी पेटगुडा जंगलातून अटक केली. कोरापूट पोलिस आणि डीव्हीएफच्या संयुक्त कारवाईत त्यांना यश मिळाले आहे.

वृत्तसंस्था ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, डीव्हीएफ टीमने 28 मे रोजी रात्री एक विशेष ऑपरेशन सुरू केले होते. सकाळी या टीमला नक्षलवाद्यांचा एक गट टेकडीवर तळ ठोकताना दिसला. टीम नक्षलवाद्यांना घेराव घालण्यासाठी पुढे जाताच त्यांनी डीव्हीएफ टीमवर गोळीबार सुरू केला आणि जंगलात पळून गेले. गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून टीमनेही गोळीबार केला. यादरम्यान, झुडुपात लपण्याचा प्रयत्न करणारे माओवादी पकडले गेले. 

कुंजम हिडमाला अटक
या कारवाईदरम्यान डिव्हीएफ टीमने कुंजम हिडमा नावाच्या कट्टर नक्षलवाद्याला यशस्वीरित्या अटक केली. त्याच्याकडून एके-47 रायफल, 35 जिवंत काडतुसे, 27 इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 90 नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 2 किलो गन पावडर, 2 स्टील कंटेनर, 2 रेडिओ, 1 इअरफोन, 1 मोटोरोला वॉकी-टॉकी, 10 बॅटरी, 2 चाकू, 1 कतुरी (लहान कुऱ्हाड), 4 टॉर्च लाईट, 15 माओवादी साहित्य आणि विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

कोण आहे कुंजम हिडमा?

कुंजम हिडमा उर्फ मोहन  नक्षली चळवळीतील एरिया कमिटी सदस्य होता. २००७ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी तो नक्षलवादी सांस्कृतिक शाखा बाल संघम आणि जन नाट्य मंडलीत सहभागी झाला. सांस्कृतिक सहभागापासून तो सैन्य प्रशिक्षण आणि नक्षली कारवायांमध्ये सहभागी झाला. २०१३ ते २०१५ या काळात हिडमाने उसुर लोकल ऑर्गनायझेशन स्क्वाड म्हणून पक्षाचा सदस्य म्हणून काम केले. सैन्य प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला सिंगल शॉर्ट रायफल जारी करण्यात आली. २०१६ मध्ये हिडमा आंध्र प्रदेश बॉर्डरवरील प्लाटून येथे काम करत होता. २०१९ मध्ये त्याला एरिया कमिटी सदस्य म्हणून पदोन्नती मिळाली. चांदमेटा, कोंडाझारी, कुंभीखारी, कोलेंगडब्बा येथील नक्षली हल्ल्यात त्याचा सहभाग होता.  

Web Title: Notorious Naxalite Kunjam Hidma arrested; Large cache of weapons including AK-47 seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.