काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला नोटीस
By Admin | Updated: July 10, 2014 02:13 IST2014-07-10T02:13:50+5:302014-07-10T02:13:50+5:30
काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोटीस देऊन चार आठवडय़ांच्या आत आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला नोटीस
नवी दिल्ली : काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोटीस देऊन चार आठवडय़ांच्या आत आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणा:या राजस्थान सरकारच्या याचिकेवरून ही नोटीस बजावली आहे.
न्या. एस.जे. मुखोपाध्याय यांच्या अध्यक्षतेतील एका पीठाने सलमानला चार आठवडय़ांत आपले उत्तर सादर करण्याचे सांगितले आहे. कनिष्ठ न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणात 2क्क्6 मध्ये सलमानविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यावर र्निबध घातले होते. राज्य सरकारने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 1998 मध्ये काळविटाच्या शिकारप्रकरणी सलमानवर गुन्हा दाखल झाला होता व त्याला पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. काळविटाची शिकार करणो हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)