दात तोडल्याने मांसाहार करता येत नव्हता; कारणीभूत मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:00 IST2019-03-09T14:58:57+5:302019-03-09T15:00:13+5:30

तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका भांडणाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने मित्राला संपविण्याचा कट रचला. बोलण्यात गुंतवून त्याला संगम विहारच्या जंगलात घएऊन गेला आणि डोक्यावर दगड मारून खून केला.

not possible to eat meat after breaking teeth; Cause friend's murder | दात तोडल्याने मांसाहार करता येत नव्हता; कारणीभूत मित्राचा खून

दात तोडल्याने मांसाहार करता येत नव्हता; कारणीभूत मित्राचा खून

नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका भांडणाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने मित्राला संपविण्याचा कट रचला. बोलण्यात गुंतवून त्याला संगम विहारच्या जंगलात घएऊन गेला आणि डोक्यावर दगड मारून खून केला. मृतदेह पिशवित जात नसल्याचे पाहून दगडावे ठेचून त्याचे हात, पाय तोडले. एवढे क्रूर होण्याचे कारण म्हणजे, तीन वर्षांपूर्वी एका भांडणामध्ये या मित्राने तरुणाचे दात तोडले होते. यामुळे त्याला मांसाहार करता येत नव्हता. या रागातून खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 


पोलिसांनी सांगितले की, आरोपी आकाश (23) याने त्याचा मित्र सनोज(19) याला न्यायालयाच्या आवारातून जंगलात नेले. सनोज एका खटल्यादरम्यान 6 मार्चला न्यायालयात आला होता. जंगलात नेल्यावर त्याला आकाशने दारु पाजली होती. तीन वर्षांपूर्वी दात तोडल्याने आकाशला मटन-चिकन खाता येत नव्हते. याचा राग त्याच्या डोक्यात होता. समोजला दारु पाजल्यावर आकाशने मागून त्याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये सनोजचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आकाशने पोते आणले होते. मात्र, सनोज त्यात मावत नसल्याने आकाशने दगडाने ठेचून त्याचे हात-पाय तोडले. 


यानंतर त्याचा मृतदेह आकाश पिशवीत भरून संगम विहारमध्ये घेऊन आला आणि लपवला. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी तपास सुरु केला आणि आकाशला अटक केली. 

Web Title: not possible to eat meat after breaking teeth; Cause friend's murder

टॅग्स :Murderखून