एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 08:08 IST2025-07-22T07:49:54+5:302025-07-22T08:08:48+5:30

'गेल्या सहा महिन्यांत एअर इंडियाला सुरक्षेच्या उल्लंघनासाठी नऊ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत',अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली.

Not once or twice, 9 show cause notices issued to Air India in six months; Government information | एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती

एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल २१ जुलैपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एअर इंडियाबाबत प्रश्न विचारण्यात आले. याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लेखी उत्तर दिले. 'गेल्या सहा महिन्यांत पाच ओळखल्या गेलेल्या सुरक्षा उल्लंघनांच्या संदर्भात एअर इंडियाला एकूण नऊ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत आणि एका उल्लंघनाच्या संदर्भात अंमलबजावणीची कारवाई पूर्ण झाली आहे',अशी माहिती या उत्तरात दिली.

जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय

'एअर इंडियाच्या एकूण ३३ विमानांपैकी ३१ कार्यरत विमानांची तपासणी करण्यात आली आहे, त्यापैकी ८ विमानांमध्ये किरकोळ त्रुटी आढळून आल्या आहेत. दुरुस्तीनंतर ही विमाने ऑपरेशनसाठी सोडण्यात आली आहेत. उर्वरित २ विमाने नियोजित देखभालीखाली आहेत', अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी सभागृहात लेखी उत्तरात दिली.

सहा महिन्यांत ९ नोटिसा जारी

सभागृहात भाजप सदस्य अशोकराव शंकरराव चव्हाण यांच्या प्रश्नाचे उत्तर देत होते. दरम्यान, वेगळ्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत क्रॅश झालेल्या विमानांबाबत एअर इंडियाच्या विश्वसनीयता अहवालात कोणताही प्रतिकूल कल दिसून आलेला नाही.

'गेल्या सहा महिन्यांत, पाच ओळखल्या गेलेल्या सुरक्षा उल्लंघनांप्रकरणी एअर इंडियाला एकूण नऊ कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. द्रमुक नेत्या कनिमोझी एनव्हीएन सोमू यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी संसदेत ही माहिती दिली.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात

१२ जून रोजी अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 हे विमान टेकऑफनंतर लगेचच कोसळले. या विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअरलाइनच्या बोईंग 787-8 विमानाची अतिरिक्त चौकशी करण्याचे आदेश दिले. या विमान अपघातात ८१ जण जखमी झाले.

Web Title: Not once or twice, 9 show cause notices issued to Air India in six months; Government information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.