सर्व मागण्या पूर्ण करणे शक्य नाही
By Admin | Updated: November 9, 2015 23:10 IST2015-11-09T23:10:51+5:302015-11-09T23:10:51+5:30
सन २००७ पूर्वीच्या निवृत्त सैनिकांना पेन्शनवाढीचा लाभ मिळवून देणाऱ्या वन रँक, वन पेन्शन (ओआरओपी) योजनेच्या औपचारिक अधिसूचनेवर माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली

सर्व मागण्या पूर्ण करणे शक्य नाही
नवी दिल्ली : सन २००७ पूर्वीच्या निवृत्त सैनिकांना पेन्शनवाढीचा लाभ मिळवून देणाऱ्या वन रँक, वन पेन्शन (ओआरओपी) योजनेच्या औपचारिक अधिसूचनेवर माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली असतानाच, सरसकट सर्व मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे.
सोमवारी एका समारोहाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ओआरओपीच्या मुद्यावर भाष्य केले. लोकशाहीत सर्वांना मागण्या करण्याचा अधिकार आहे. पण प्रत्येकवेळी सर्व मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाही. माजी सैनिकांची वन रँक, वन पेन्शनची मुख्य मागणी पूर्ण केली गेली आहे. उर्वरित मागण्यांबाबतही आम्ही ५ सप्टेंबरला घोषणा केली होती. यात व्हीआरएसबाबतचा भ्रम दूर करण्यात आला आहे. याउपर सरसकट सगळ्याच मागण्या पूर्ण करणे शक्य नाही. कारण सर्व मागण्याच पूर्ण झाल्या तर अन्य एखादा दुसरीच एखादी मागणी घेऊन उभा होईल, असे पर्रीकर यावेळी म्हणाले. आणखी काही समस्या वा अडचणी असतील तर न्यायिक आयोग त्यावर विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.