काळजी घ्या! दक्षिण कोरियाचा आजार भारतात आला,अनेकांची प्रकृती बिघडली; लक्षणे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 10:00 IST2024-07-28T09:57:51+5:302024-07-28T10:00:39+5:30
Norovirus Outbreak : दक्षिण कोरियातील नोरोव्हायरचे रुग्ण आता हैदराबादमध्ये सापडले आहेत.

काळजी घ्या! दक्षिण कोरियाचा आजार भारतात आला,अनेकांची प्रकृती बिघडली; लक्षणे काय?
कोरोना व्हायरसमुळे देशभरात मोठा गोंधळ उडाला होता, दोन वर्ष देशात लॉकडाऊन होता. आता दक्षिण कोरियामध्ये नोकोव्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या व्हायरसमुळे अनेकांना त्रास सुरू झाला आहे. आता या आजाराचे रुग्ण भारतातील हैदराबादमध्येही सापडले आहेत. अनेकांना उलट्याटा त्रास सुरू झाला आहे.
हैदराबादमध्ये महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा साथीचा आजार असल्याने तो झपाट्याने पसरत आहे.अनेक खबरदारी घेतल्यास तो टाळता येऊ शकतो हे यावरून दिसून येते.हैदराबाद येथील जुने शहर परिसरात अनेकांना उलट्या, जुलाबाचा त्रास होत आहे. डबीर पुरा, याकूत पुरा, पुराण हवेली, मुघल पुरा, मलक पाटे आदी भागातील लोक आजारी पडत आहेत.
हैदराबादमध्ये दररोज शंभरहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. नोरो व्हायरसने ग्रस्त शेकडो लोक सरकारी आणि खासगी रुग्णालात दाखल होत आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.
आजाराचे लक्षणे काय आहेत?
वारंवार उलट्या होणे,लाळ सुटणे, जास्त तहान लागणे, लघवी कमी होणे, किंवा लघवीचा रंग बदलणे, तीव्र पोटदुखी, अत्यंत थंडी जाणवणे, संधिवात, डोकेदुखी.
ही लक्षणं जर तुम्हाला असतील तर लगेच डॉक्टरांकडे तपासणी करा. अन्यथा मोठा धोका होऊ शकतो. हैदराबादमधील अनेक लोकांना या लक्षणांमुळे त्रास होत असून त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. दूषित अन्न आणि पाण्यामुळे नोरोव्हायरसचा संसर्ग होतो. प्रदूषित वातावरणामुळेही या विषाणूचा प्रसार होतो. हे सांसर्गिक आहे म्हणून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरत आहे.