नामपूर उर्वरीत बातमी
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:21+5:302015-02-14T23:50:21+5:30
रस्त्यांवर दगडांचे ढीग तयार करून वाहतूक बंद केली. तरीही ठेकादाराने कोठलाही पर्यायी रस्ता केला नाही. ही वाहतूक आसखेडा-फोपीरमार्गे नामपूरकडे सात ते आठ कि.मी. ने वळवून वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत आहे. पुलाचे काम करीत असताना शासन समांतर रस्त्यासाठी निधी मंजूर करीत असते. मग या पुलाच्या कामाला समांतर रस्त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला नाही का? केला असेल तर समांतर रस्ता का नाही? व निधी मंजूर केला नसेल तर तो का मंजूर केला नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे.

नामपूर उर्वरीत बातमी
र ्त्यांवर दगडांचे ढीग तयार करून वाहतूक बंद केली. तरीही ठेकादाराने कोठलाही पर्यायी रस्ता केला नाही. ही वाहतूक आसखेडा-फोपीरमार्गे नामपूरकडे सात ते आठ कि.मी. ने वळवून वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत आहे. पुलाचे काम करीत असताना शासन समांतर रस्त्यासाठी निधी मंजूर करीत असते. मग या पुलाच्या कामाला समांतर रस्त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला नाही का? केला असेल तर समांतर रस्ता का नाही? व निधी मंजूर केला नसेल तर तो का मंजूर केला नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे.मालेगाव-अहवा हा रस्ता अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता नामपूर-आसखेडा-जायखेडा हा १२ कि.मी. व अंबासन ते वडनेर व अंजगपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यांचे डांबर उखडलेले आहे. प्रचंड मोठाली खड्डेही पडलेली आहेत. मात्र रस्ता दुरुस्ती होत नाही. आसखेडा एकेरी असल्याने याच्या साईडपया मोठ्या प्रमाणावर खोल गेल्या आहेत.नामपूर-लेहेड-साक्री व नामपूर म्हसदी या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. चिराई व म्हसदी येथील धनदाई या देवता अनेकांच्या कुलदेवता आहेत. नाशिक नगर, जळगाव, धुळे या जिल्हयातील अनेक कुळांच्या धनदाई देवी हे कुलदैवत आहे. या देवीच्या दर्शनासाठी लांब पल्याहून भक्त मंडळी स्वत:च्या वहानाने दर्शनास येतात. मात्र रस्त्यावरच नादुरुस्त होतात. कुलदेवतेच्या दर्शनासाठी पुन्हा दुसर्या वाहनाची शोधाशोध करावी लागते. म्हसदी रस्ता इतका खराब आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बर्याचशा डेपोंनी आपल्या नियमित बसफेर्या सुद्धा बंद करुन दिल्या आहेत.