शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

३४ मंत्र्यांना दिली उमेदवारी; पहिल्या यादीत भाजपचा सावध पवित्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 07:10 IST

यादीत ३४ विद्यमान मंत्र्यांची नावे आहेत. राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, पुढच्या काळात भाजपकडून  जाहीर होणाऱ्या उर्वरित २४० नावांच्या यादीत आश्चर्य दिसू शकते.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली :  मंत्रिमंडळात एकूण ७८ सदस्य असलेल्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री मीनाक्षी लेखी वगळता इतर कोणत्याही मंत्र्याला लोकसभेचे तिकीट नाकारलेले नाही. शनिवारी जाहीर झालेल्या १९५ उमेदवारांच्या यादीत डॉ. हर्षवर्धन, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   

यादीत ३४ विद्यमान मंत्र्यांची नावे आहेत. राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, पुढच्या काळात भाजपकडून  जाहीर होणाऱ्या उर्वरित २४० नावांच्या यादीत आश्चर्य दिसू शकते. उत्तर प्रदेशातून जाहीर झालेल्या ५१ जणांच्या यादीत मनेका गांधी व मुलगा वरुण गांधी यांचे नाव नाही. ब्रिजभूषण शरण सिंह यांचेही नावही नाही. पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचे पुत्र साकेत मिश्रा यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. दिल्लीतील ५ नावांपैकी चार नवे चेहरे आहेत. गुजरातमध्ये १५ पैकी १० नावे तीच आहेत, पाच नवीन आहेत. 

भाजपने १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु युती असलेल्या अनेक महत्त्वाच्या राज्यांतील नावे मागे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, हरयाणा, हिमाचल, कर्नाटक, ओडिशा, बिहार, तामिळनाडू आणि इतरांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने येत्या दहा दिवसांत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतरच पक्ष नेतृत्व याबाबत पुढील पाऊल टाकेल. 

राज्यसभेतील कोणते सदस्य रिंगणात - मनसुखा मांडविया, पुरुषोत्तम रुपाला, भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर अशा राज्यसभेचे सदस्य असलेल्या अनेक मंत्र्यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. - मात्र निर्मला सीतारामन, एस. जयशंकर आणि इतर अनेक मंत्री या यादीत दिसत नाहीत. आसनसोलमधील गायक पवन सिंग वगळता या यादीत फारसे चित्रपट कलाकार नाहीत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा