कोरोना योद्ध्यांच्या मुलांना स्कॉलरशीप देणार देशातील 'ही' युनिव्हर्सिटी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:50 PM2020-08-20T15:50:23+5:302020-08-20T15:51:09+5:30

कोरोना लॉकडाऊन काळात सेवा बजावणाऱ्या पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, पत्रकार आणि सफाई कामगारांच्या पाल्यांना ही स्कॉलरशीप देण्यात येणार आहे.

noida university in the country to offer scholarships to the children of Corona warriors | कोरोना योद्ध्यांच्या मुलांना स्कॉलरशीप देणार देशातील 'ही' युनिव्हर्सिटी 

कोरोना योद्ध्यांच्या मुलांना स्कॉलरशीप देणार देशातील 'ही' युनिव्हर्सिटी 

Next
ठळक मुद्देकोरोना लॉकडाऊन काळात सेवा बजावणाऱ्या पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, पत्रकार आणि सफाई कामगारांच्या पाल्यांना ही स्कॉलरशीप देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - जागतिक महामारी बनलेल्या कोरोना काळात कोविड योद्धा बनून काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना नोएडा युनिव्हर्सीटीकडून स्कॉलरशीप देण्यात येणार आहे. ग्रेटर नोएडा येथील नोएडा युनिव्हर्सिटीने कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ ही घोषणा केली. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक आणि नोएडा युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु डॉ. विक्रम सिंह यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली. 

कोरोना लॉकडाऊन काळात सेवा बजावणाऱ्या पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, पत्रकार आणि सफाई कामगारांच्या पाल्यांना ही स्कॉलरशीप देण्यात येणार आहे. कोरोना योद्ध्यांच्या मुलांनी येथील विद्यापीठात प्रवेश घेतल्यास, त्यांना फी मध्ये 20 टक्के सवलत मिळणार आहे. या स्कॉलरशीपमध्ये ट्युशन फी, बोर्डिंग फी आणि इतरही दुसरे शुल्क सहभागी आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच ही स्कॉलरशीप सुरू करण्यात येणार असल्याचेही विक्रमसिंह यांनी सांगितले. जोपर्यंत पाल्य या विद्यापीठातशिक्षण घेईल, तोपर्यंत या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी, प्रत्येक सेमिस्टरमध्ये पाल्यास 60 टक्के गुण घ्यावे लागणार आहेत. नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे एक खासगी विश्वविद्यालय आहे. सद्यस्थितीत येथील युनिव्हर्सिटीत 29 देशांमधील जवळपास 4 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Web Title: noida university in the country to offer scholarships to the children of Corona warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.