शाब्बास पोरा! रस्त्यावर टॉवेल विकणाऱ्याचा लेक होणार इंजिनियर; JEE Mains मध्ये मिळाले 99.2%
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 15:46 IST2023-08-11T15:45:34+5:302023-08-11T15:46:23+5:30
बळवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर उन्हात उभं राहिल्यावर एक हजार रुपये हातात येतात.

फोटो - आजतक
नोएडा परिसरात टॉवेल विकणाऱ्या बलवंत सिंह यांच्या मुलाने दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आहे. मूळचे अलीगडचे रहिवासी असलेले बलवंत सिंह नोएडा सेक्टर 37 ते 18 म्हणजेच नोएडा दादरी रोड सेक्टर 38 कडे येणाऱ्या रस्त्यावर गेल्या 25 वर्षांपासून टॉवेल विकत आहेत.
बळवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर उन्हात उभं राहिल्यावर एक हजार रुपये हातात येतात. बळवंत यांना दोन मुलं आहेत. मुलगा सुरजल (18) आणि मुलगी मुस्कान (20) दोघेही अभ्यासात चांगले आहेत. मुलगा सुरजल अभ्यासात हुशार होता. त्याला आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता, त्याने बारावीनंतर एक ड्रॉप घेतला आणि ऑनलाईन कोचिंग क्लासेस घेऊन जेईई मेनची तयारी सुरू केली.
सुरजलला जेईई मेनमध्ये 99.2% मिळाले. मेनमध्ये चांगल्या टक्केवारीमुळे सुजलची दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागात निवड झाली. मुलगा अभ्यासात चांगला आहे, कसं तरी कष्ट करून मुलांना शिकवणार असल्याचं बळवंत सांगतात. बळवंत यांनी सांगितले की, सुजलला भविष्यात यूपीएससीची तयारी करायची आहे. मुलगी मुस्कानही अभ्यासात चांगली आहे आणि ती इग्नूमधून बीएससी करत आहे तसेच यूपीएससीची तयारी करत आहे.
बळवंत यांनी सांगितले की, शिकवण्यासाठी फारसे पैसे नव्हते, त्यामुळे मुलाचा प्रवेशही दिल्लीतील मोरी गेटजवळील सरकारी शाळेत झाला. डीटीयूची वार्षिक फी दोन लाख रुपये आहे, जी बळवंत यांनी त्याच्या नातेवाईकांकडून घेतली. मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेणार असल्याचं बळवंत सांगतात. या महिन्यापासून मुलगा कॉलेजला जाणार आहे. मुलाने अभ्यासासाठी लॅपटॉप आणण्यास सांगितले. कर्ज घेऊन लॅपटॉपही घेणार असल्याचंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.