Society Insurance: ऐकावं ते नवलंच! रहिवाशांनी काढला सोसायटीचा तब्बल 210 कोटींचा विमा, हे आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:23 IST2022-07-01T16:22:00+5:302022-07-01T16:23:24+5:30
Society Insurance: दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामध्ये एका सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी चक्क सोसायटीचा विमा काढला. यासाठी 815 फ्लॅट मालकांकडून दरमहा 56 रुपये आकारले जाणार आहेत.

Society Insurance: ऐकावं ते नवलंच! रहिवाशांनी काढला सोसायटीचा तब्बल 210 कोटींचा विमा, हे आहे कारण...
Greater Noida Society Insurance: तुम्ही आतापर्यंत व्यक्तीचा, गाडीचा, प्राण्यांचा विमा ऐकला असेल. पण, दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामध्ये चक्क एका सोसायटीचा विमा करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडामधील गौर सिटी गॅलेक्सी नॉर्थ अव्हेन्यू येथे AOA (Apartment of owners association) ने दंगल, चोरी आणि दरोडा यांसारख्या घटनांपासून बचावासाठी एक अनोखा पुढाकार घेतला आहे. AOA ने आपल्या संपूर्ण सोसायटीचा तब्बल 210 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.
दरमहा 56 रुपये द्यावे लागणार
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये पहिल्यांदाच एखाद्या सोसायटीला अशाप्रकारे विमा उतरवला गेला आहे. संपूर्ण सोसायटीमध्ये 815 फ्लॅट्स आहेत. या विमाच्या बदल्यात प्रत्येक फ्लॅट मालकाकडून दरमहा 56 रुपये आकारले जातील. संपूर्ण 815 फ्लॅटसाठी वार्षिक प्रीमियम सुमारे 5 लाख 47 हजार रुपये आहे. विम्यामध्ये दंगल, आग, भूकंप, संप, दहशतवादी कारवायांमध्ये नुकसान, वादळ अशा अनेक घटनांचा समावेश आहे.
यामुळे घेतला निर्णय
अशाप्रकारचा विमा घेण्यामागचे कारण रहिवाशांनी सांगितले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सोसायटीत लिफ्ट बिघडली होती. लिफ्ट बिघडण्याचे कारण काय आहे हे पाहण्याचा बिल्डरने प्रयत्न केला केला. त्यानंतर ज्या व्यक्तीमुळे लिफ्ट बिघढली, त्या फ्लॅट मालकाला दंड ठोठावला. नंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली, पण यात सुमारे 15 दिवस लिफ्ट बंद होती. विमा घेतल्यास अशाप्रकारच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.