गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 16:28 IST2019-01-29T16:23:48+5:302019-01-29T16:28:11+5:30
पोलिसांनी छापेमारी करत 10 क्विंटल गोमांस जप्त केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दादरी पोलिसांनी दोन जणांना अटकदेखील केली आहे.

गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक
नोएडा - पोलिसांनी छापेमारी करत 10 क्विंटल गोमांस जप्त केल्याची घटना समोर आली आहे. दादरी क्षेत्रातील बैरंगपूर गावातील पेट्रोल पंप जवळील ही घटना आहे. याप्रकरणी दादरी पोलिसांनी दोन जणांना अटकदेखील केली आहे.
दादरी पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक राम सेन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (28 जानेवारी) रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बैरंगपूर गावाजवळील मोहसिन आणि कदीर नावाच्या व्यक्तींना अटक केली आहे. या दोघांकडे असलेल्या वाहनामधील 10 क्विंटल गोमांस जप्त करण्यात आले आहे.
(गोवंश मांसाची विदेशात तस्करी)
याप्रकरणी खोडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या कुलदीप यांनी दादरी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.