Tamil Nadu: "तामिळनाडूत हिंदीला थारा नाही" मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा केंद्राला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 17:50 IST2026-01-25T17:49:04+5:302026-01-25T17:50:29+5:30

M.K. Stalin: आज भाषा शहीद दिनानिमित्त तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्याच्या भाषिक अस्मितेचा पुनरुच्चार केला. १९६० च्या दशकातील हिंदी विरोधी आंदोलनात बलिदान देणाऱ्या विरांना अभिवादन करत त्यांनी केंद्राच्या हिंदी लादण्याच्या प्रयत्नांवर कडाडून टीका केली.

No Space for Hindi in Tamil Nadu, Now or Ever, CM MK Stalins Strong Message on Language Martyrs  Day | Tamil Nadu: "तामिळनाडूत हिंदीला थारा नाही" मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा केंद्राला इशारा

Tamil Nadu: "तामिळनाडूत हिंदीला थारा नाही" मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा केंद्राला इशारा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी भाषा शहीद दिनानिमित्त केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. तामिळनाडूमध्येहिंदी लादण्यासाठी पूर्वीही जागा नव्हती, आज ही नाही आणि भविष्यात कधीही नसेल, अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. १९६० च्या दशकातील ऐतिहासिक हिंदी विरोधी आंदोलनातील आंदोलकांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी राज्याची भाषिक अस्मिता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी चेन्नईतील भाषा शहीद थलामुथु आणि नटरासन यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. या निमित्ताने त्यांनी चेन्नई महानगर विकास प्राधिकरण इमारतीमध्ये या दोन प्रमुख शहीदांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. यावेळी बोलताना स्टॅलिन म्हणाले की, तामिळनाडूने केवळ स्वतःच्या भाषेसाठीच नव्हे, तर भारतीय उपखंडातील विविध भाषिक आणि राष्ट्रीय गटांच्या हक्कांच्या रक्षणासाठी या चळवळीचे नेतृत्व केले आहे.

स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर १९६५ च्या हिंदी विरोधी आंदोलनाचा एक भावूक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये द्रमुकचे दिवंगत नेते सी.एन. अन्नादुराई आणि एम. करुणानिधी यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "आम्हाला आमची भाषा जीवापाड प्रिय आहे. जेव्हा जेव्हा तामिळ भाषेला दाबण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा आमचा निषेध अधिक तीव्र होईल."

१९६४-६५ दरम्यान तामिळनाडूमध्ये हिंदीला अधिकृत भाषा करण्याच्या विरोधात मोठे जनआंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान अनेक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती, तर काहींनी आत्मदहन केले होते. या आंदोलकांसाठी भाषा शहीद हा शब्द वापरला जातो. या संघर्षानंतरच तामिळनाडूने द्विभाषिक सूत्र स्वीकारले, ज्याचे पालन आजही केले जाते.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला द्रमुक सरकारने सातत्याने विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकार या धोरणाच्या माध्यमातून हिंदी भाषिक नसलेल्या राज्यांवर मागच्या दाराने हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केला आहे. तामिळनाडू आपली भाषिक ओळख आणि संस्कृती जपण्यासाठी ठाम राहील, असेही त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.

Web Title : तमिलनाडु में हिंदी अस्वीकार्य: स्टालिन ने केंद्र को भाषा थोपने पर चेतावनी दी

Web Summary : तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टालिन ने हिंदी थोपने का कड़ा विरोध किया, भाषा शहीदों को याद किया। उन्होंने हिंदी के खिलाफ तमिलनाडु के ऐतिहासिक रुख पर जोर दिया, अपनी भाषाई पहचान की रक्षा करने और केंद्र सरकार की राष्ट्रीय शिक्षा नीति को हिंदी लागू करने का एक गुप्त प्रयास बताते हुए निंदा की।

Web Title : Tamil Nadu Rejects Hindi: Stalin Warns Center on Language Imposition

Web Summary : Tamil Nadu CM Stalin strongly opposes Hindi imposition, commemorating language martyrs. He asserts Tamil Nadu's historical stance against Hindi, vowing to protect its linguistic identity and denouncing the central government's National Education Policy as a backdoor attempt to enforce Hindi.