शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

'मुस्लिम निर्लज्ज, 800 वर्षे राज्य करूनही स्वतःला मागासवर्गीय म्हणवतात' - सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 9:36 PM

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर जोरदार हल्ला चढवताना मुस्लिमांना निर्लज्ज म्हटलं आहे.

नवी दिल्ली: भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर जोरदार हल्ला चढवताना मुस्लिमांना निर्लज्ज म्हटलं आहे. ज्यांनी 800 वर्षे देशावर राज्य केलं ते जर स्वतःला मागासवर्गीय म्हणत असतील तर त्यांच्यासाठी  शरमेची बाब आहे, असं ते म्हणाले.  मुस्लिम समाज मागासवर्गीय नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही असंही स्वामी म्हणाले.इंग्रजी न्यूज चॅनल टाइम्स नाऊवर स्वामी म्हणाले की, देशात ब्राम्हण गरीब आहेत, क्षत्रियदेखील गरीब आहेत. मात्र, ते कधी आरक्षणाची मागणी करत नाहीत. उलट मुस्लिम निर्लज्जाप्रमाणे आरक्षणाची मागणी करत आहेत. देशावर 800 वर्ष राज्य केल्यानंतर ते आता स्वतःला मागासवर्गीय म्हणण्याची मागणी करत आहेत. धार्मिक बाबीवरुन आपण कुठल्याही प्रकारे मागासपणा निश्चित करु शकत नाही. मात्र, ओवेसी जर खरोखर कोणत्या मागास व्यक्तीचे नाव सुचवत असतील, तर त्याला आम्ही शिष्यवृत्ती देऊ शकतो. तसेच त्या व्यक्तीला मदत देखील करु शकतो, असेही स्वामी यांनी म्हटले. याशिवाय स्वामी म्हणाले, ओवेसीने बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्याप्रमाणे विचार करायला हवा. काशीराम यांनी अनुसुचित जातींना आरक्षणाचा विचार करण्याऐवजी समाजाच्या ताकदीबद्दल विचार करण्याची शिकवण दिली होती.ओवेसी यांनी ट्वीट करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा मुद्दा छेडला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीआधी पाटीदार नेता हार्दिक पटेलने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हार्दिक पटेलच्या भूमिकेवर टीका करत मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. 'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही, जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत'. असं ट्विट ओवेसी यांनी केलं होतं. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीMuslimमुस्लीमAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी