'या' राज्यात आता प्रवासासाठी 'ई-पास'ची गरज नाही; १४ दिवस क्वारंटाईन सुद्धा नाही... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 15:16 IST2020-08-25T15:10:11+5:302020-08-25T15:16:13+5:30

सीमा, बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर वैद्यकीय तपासणीवर सुद्धा बंदी घातली आहे.

No quarantine, no registering on Seva Sindhu: Karnataka relaxes travel norms | 'या' राज्यात आता प्रवासासाठी 'ई-पास'ची गरज नाही; १४ दिवस क्वारंटाईन सुद्धा नाही... 

'या' राज्यात आता प्रवासासाठी 'ई-पास'ची गरज नाही; १४ दिवस क्वारंटाईन सुद्धा नाही... 

ठळक मुद्देआतापर्यंत कर्नाटकात १४ दिवस क्वारंटाईन आवश्यक होते.आता कोणत्याही निर्बंधाशिवाय रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गाने कर्नाटकला जाता येते.

बंगळुरु : कर्नाटकात लॉकडाऊनच्या पाच महिन्यानंतर प्रवासी वाहतूक संबंधी सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये ई-पास किंवा 14 दिवस क्वारंटाईनची देखील आवश्यक नाही. निर्बंध हटविल्यानंतर राज्य गृह मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले जात आहे.

सुधारित प्रोटोकॉलनुसार, कर्नाटकात येणाऱ्या लोकांना प्रवेशासाठी सेवा सिंधू पोर्टलवर पास घेण्याची गरज भासणार नाही. तसेच कर्नाटकात सीमा, बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर वैद्यकीय तपासणीवर सुद्धा बंदी घातली आहे. आता कोणत्याही निर्बंधाशिवाय रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गाने कर्नाटकला जाता येते.

जर कर्नाटकला आल्यानंतर एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तर तो १४ दिवस होम क्वारंटाईन न राहता कामावर जाऊ शकतो किंवा बाहेर फिरू शकतो. मात्र, त्या व्यक्तीला १४ दिवस स्वत:ला निरीक्षण करावे लागेल. जर लक्षणे दिसली तर त्या व्यक्तीला सेल्फ आयसोलेट होऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.

याव्यतिरिक्त, कर्नाटकातील लोकांना मूलभूत कोविड -१९ चे नियम पाळावे लागतील. म्हणजेच मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, साबण- पाणी किंवा सॅनिटायझरने हात धुणे यासारखे नियम पाळावे लागतील. आतापर्यंत कर्नाटकात १४ दिवस क्वारंटाईन आवश्यक होते आणि प्रवाशांवर नजर ठेवण्याचा नियम होता. सेवा सिंधू अधिकाऱ्यांच्या मते कर्नाटकात येण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत या पोर्टलमध्ये ११ लाख लोकांनी नोंदणी केली.

कर्नाटकात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे ५,८५१ नवे रुग्ण आढळले. राज्यात कोरोना संक्रमित झालेल्यांची संख्या २, ८३, ६६५ इतकी झाली आहे. मात्र, या कालावधीत ८, ०१६ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने म्हटले आहे की, सोमवारी कोरोना विषाणूमुळे १३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ४,८१० लोकांचा मृत्यू झाला आहे.

आणखी बातम्या...

"काँग्रेसमधील बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहतायेत"    

- चेतन चौहान यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, शिवसेनेची मागणी; पण...    

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!! 

Web Title: No quarantine, no registering on Seva Sindhu: Karnataka relaxes travel norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.