शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Nirmala Sitharaman: नव्या नोटा छापून देशावरील संकट दूर करणार मोदी सरकार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 5:00 PM

print more currency to solve economic slowdown: अर्थव्यवस्थेला सहारा देण्यासाठी नवीन चलनी नोटा छापण्यात याव्यात आणि नोकऱ्या वाचविण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला अनेक अर्थतज्ज्ञांनी मोदी सरकारला दिला आहे.

देशात खासकरून गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचे (Corona Financial Crisis) ढग गडद होत गेले आहेत. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडला असून तांत्रिक दृष्ट्या मंदीच्या फेऱ्यात देश अडकला आहे. यंदा त्यात थोडीफार सुधारणा होताना दिसत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांनी लोकसभेत (Loksabha) यावर एक मोठे वक्तव्य केले आहे. (The government does not plan to print more currency to tide over the economic slowdown brought about by the COVID-19 pandemic)

केंद्र सरकार नवीन नोटा छापून आर्थिक संकट दूर करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  'जी नहीं श्रीमान!' असे उत्तर दिले आहे. आर्थिक संकटापासून वाचण्यासाठी नवीन नोटा छापण्याचा कोणताही विचार नसल्याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी संसदेत केला आहे. 

अनेक अर्थतज्ज्ञांनी  सरकारला सल्ला दिला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेला सहारा देण्यासाठी नवीन चलनी नोटा छापण्यात याव्यात आणि नोकऱ्या वाचविण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला आहे. लोकसभेत अर्थमंत्र्यांनी एका प्रश्नावर लिखीत उत्तर दिले आहे. यामध्ये जीडीपीमध्ये 2020-21 मध्ये 7.3 टक्के एवढी घट होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या. 

जीडीपीच्या घसरणीवरून हे समजतेय की कोरोना महामारीचा परिणाम किती खोलवर झाला आहे आणि आम्ही त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलली आहेत. अर्थव्य़वस्थेचा पाया भक्कम आहे. लॉकडाऊन हळू-हळू हटविणे आणि आत्मनिर्भर भारत मिशनसारख्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. यामुळे दुसऱ्या सहामाहीत सुधारणा दिसत आहे, असे त्या म्हणाल्या.

सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे 29.87  लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडता येईल, आर्थिक नुकसान भरून निघेल आणि रोजगार वाढतील हा उद्देश होता. असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनMONEYपैसाlok sabhaलोकसभा