शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

आम्हाला तर कुणी पाणीही विचारत नाही, संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 3:21 PM

ससंदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, पेगासस फोन टॅपिंगसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवर चर्चा कऱण्यासाठी राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांची बैठक बोलावली होती.

ठळक मुद्देविशेष बाब म्हणजे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत सहभागी झालेल्या संजय राऊत यांना या बैठकीत पहिल्या पंक्तीत स्थान देण्यात आले होते. तसेच राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात यावेळी काही काळ अनौपचारिक चर्चाही झाली.

नवी दिल्ली - प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर विरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या गतीमान हालचाली सुरू झाल्याचे दिसून येते. संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पेगाससच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यानंतर, याच मुद्द्यावर सातत्याने विरोधी पक्ष एकत्र येऊन बैठका घेत आहेत. आज, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये, शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती होती. त्यावेळी, राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. 

ससंदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, पेगासस फोन टॅपिंगसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवर चर्चा कऱण्यासाठी राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील विविध विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते. संजय राऊत यांचा या बैठकीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी मोदी आम्हाला पाणीही विचारत नाहीत, असे म्हटलंय.  'जर पंतप्रधानांनी चाय पे चर्चासाठी बोलावलं तर अवश्य जाऊ. पण पंतप्रधानांनी आम्हाला बोलवायला हवं. आम्हाला तर कुणी पाणीदेखील विचारत नाही, ते तर सर्वांचे पंतप्रधान आहेत.', असे राऊत या व्हिडिओत बोलताना दिसतात. विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत सहभागी झालेल्या संजय राऊत यांना या बैठकीत पहिल्या पंक्तीत स्थान देण्यात आले होते. तसेच राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात यावेळी काही काळ अनौपचारिक चर्चाही झाली. तसेच या संवादाचा फोटो काँग्रेसकडून सोशल मीडियावर विशेष करून शेअर करण्यात आल्याने शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री आता अधिक दृढ झाल्याचे संकेत मिळत आहेत. 

दरम्यान,  पेगॅसस फोन टॅपिंगप्रकरणी सविस्तर चर्चेची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यावरुन गेले दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज होउ शकले नाही. केंद्र सरकारने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे पुढील रणनिती काय असावी, याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. याशिवाय विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी संसदेबाहेर समांतर अधिवेशन घेण्याची योजना असल्याचे सुत्रांनी सांगितले. पेगॅसस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारकडून कोरोना महामारीच्या हताळणीचे मुद्दे समांतर अधिवेशनाद्वारे जनतेसमोर मांडण्याची विरोधकांची योजना आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतdelhiदिल्लीShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधी