शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

...म्हणून 'तो' मंत्री दररोज ५० फूट उंच आकाश पाळण्यात बसतो; तीन तास तिथेच थांबतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 10:53 IST

MP Minister Sits In A 50 Feet High Swing for mobile network: मध्य प्रदेशचे मंत्री ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी बसतात आकाश पाळण्यात

अशोकनगर: मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है, डिजिटल इंडिया अशा घोषणा सरकारकडून करण्यात येतात. त्यासाठीच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती होतात. पण या घोषणा प्रत्यक्षात जमिनीपर्यंत पोहोचतात का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. सरकारच्या अनेक घोषणा, सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. कधी कधी याचा फटका नेते मंडळींना बसतो. मध्य प्रदेशमधील एका मंत्र्यांना याचा अनुभव येत आहे. (MP Minister Sits In A 50 Feet High Swing for mobile network)झूम मिटींग सुरू असतानाच बायको किस करायला आली; अन् व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....मध्य प्रदेशातल्या ग्रामीण भागांत आजही मोबाईलला रेंज येत नाही. नेटवर्कमध्ये समस्या असल्यानं लोक झाडांवर चढतात. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे मंत्रिमंडळातील सहकारी बृजेंद्र सिंह यादव यांनादेखील या समस्येचा सामना करत आहेत. त्यांना फोनवरून बोलण्यासाठी ५० फूट आकाश पाळण्यात बसावं लागतं. आकाश पाळण्यात बसल्यावरच त्यांना नेटवर्क मिळतं. त्यामुळे दिवसातले ३ तास यादव आकाश पाळण्यात जाऊन बसतात. चपात्यांना थुंकी लावून लोकांना वाढायचा; समोर आला किळसवाणा प्रकार, व्हायरल होताच चोप चोप चोपलंलोक आरोग्य राज्यमंत्री असलेले यादव मूळचे मुंगावलीच्या सुरेल गावचे आहेत. सध्या गावात भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचे प्रमुख आयोजक यादवच असल्यानं ते ९ दिवस गावातच आहेत. खुद्द मंत्रीच गावात आल्यानं ग्रामस्थ मोठ्या अपेक्षेनं त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जातात. गावकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी यादव यांना फोनाफोनी करावी लागते. पण त्यासाठी मोबाईल नेटवर्क मिळत नाही.ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी यादव यांना अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या लागतात. पण मोबाईलला रेंज नसल्यानं यादव यांना अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येत नाही. गावाच्या आसपास डोंगराळ भाग असल्यानं नेटवर्क मिळत नाही. त्यामुळेच यादव अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी दररोज आकाश पाळण्यात जाऊन बसतात. तिथून ते अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधतात आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश