'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:59 IST2025-08-23T13:57:01+5:302025-08-23T13:59:17+5:30

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षावर मध्यस्थी करण्याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे.

'No mediation on India-Pakistan issue is acceptable External Affairs Minister S Jaishankar clearly told Trump without naming him | 'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले

'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. "भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाच्या मुद्द्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारची मध्यस्थी मान्य नाही. १९७० पासून पन्नास वर्षे उलटून गेली आहेत आणि ही एक राष्ट्रीय सहमती आहे, असं विधान एस जयशंकर यांनी एका कार्यक्रमात केले. 

"ज्यावेळी व्यापाराचा प्रश्न येतो, जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न येतो, जेव्हा आमच्या धोरणात्मक स्वायत्ततेचा प्रश्न येतो, जेव्हा मध्यस्थीला विरोध येतो तेव्हा हे सरकार अगदी स्पष्ट आहे, असंही एस जयशंकर म्हणाले. 

तापमानवाढीमुळे कामगारांचे आरोग्य आले धोक्यात; गर्भवती महिलांवर होतोय वाईट परिणाम

शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असेल ते आम्ही करू- एस जयशंकर

एस जयशंकर म्हणाले की, जर कोणी आमच्याशी असहमत असेल तर कृपया भारतातील लोकांना सांगा की तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यास तयार नाही.  तुम्हाला धोरणात्मक स्वायत्ततेची किंमत नाही. आम्हाला ते आवडते. ती राखण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते आम्ही करू.

युद्धविरामचा ट्रम्प यांनी केला दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा भारत -पाकिस्तानमधील युद्धविराम केल्याचा दावा केला. भारताने ट्रम्प यांनी युद्धविराम केल्याचा दावा खोडून काढला आहे, पाकिस्तानच्या मुद्द्यावर कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी  मान्य नाही, असंही एस जयशंकर म्हणाले. 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आत १०० किमी आत घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले. 

Web Title: 'No mediation on India-Pakistan issue is acceptable External Affairs Minister S Jaishankar clearly told Trump without naming him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.