No Confidence Motion: भाषणादरम्यान राहुल गांधी बोलले असे काही, मोदींनाही हसू आवरले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 15:22 IST2018-07-20T15:20:25+5:302018-07-20T15:22:02+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र यादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरता आले नाही.

No Confidence Motion: भाषणादरम्यान राहुल गांधी बोलले असे काही, मोदींनाही हसू आवरले नाही
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान लोकसभेत आरोप प्रत्यारोप आणि गोंधळ होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र यादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरता आले नाही.
मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले पंतप्रधान देशाबाहेर जात नाहीत. हे ऐकताच मोदी हसू लागले. मात्र चूक लक्षात आल्यावर राहुल गांधींनी पंतप्रधान बाहेर जातात, पण केवळ ओबामा आणि ट्रम्प यांना भेटण्यासाठी, अशी सारवासारव केली. त्यावर सभागृहात हास्याची लकेर उमटली.
PM Narendra Modi laughs after Rahul Gandhi says 'Pradhanmantri apni aankh meri aankh mein nahi daal sakte' #NoConfidenceMotionpic.twitter.com/qwXNt6PphM
— ANI (@ANI) July 20, 2018
यानंतरही राहुल गांधी यांनी मोदींवरील हल्ले सुरूच ठेवले. त्यांनी राफेल करार, रोजगार यासारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा राहुल गांधींच्या अजून एका वक्तव्यामुळे सभागृहाला हसू आवरता आले नाही. आवेशामध्ये भाषण करताना राहुल गांधींनी मोदी हे माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत, असे वक्तव्य केले. त्यामुळे सभागृहात पुन्हा हास्याची कारंजी उमटली.