शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भारतातून फरार झालेल्या नित्यानंद बाबाने स्थापन केला स्वतंत्र देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 4:10 PM

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नित्यानंद बाबा देश सोडून पसार झाला होता

नवी दिल्ली - भारतातून फरार झालेला वादग्रस्त महाराज नित्यानंद बाबा याने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. नित्यानंद बाबा भारतातून फरार झाल्याचे साधारण महिन्याभरापूर्वी उघडकीस आले होतेय दरम्यान, आता त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात एक बेट विकत घेऊन तिथे स्वतंत्र देश स्थापन केल्याचा दावा करण्यात येत आहे. या देशाचे कैलासा असे नामकरण करण्यात आले असून, त्याचे स्वतंत्र सरकारही स्थापन करण्यात आले आहे. कैलासा हे हिंदू राष्ट्र असल्याचे जाहीर केले गेले आहे.नित्यानंद बाबावर कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो देश सोडून पसार झाला आहे. यापूर्वीही नित्यानंद बाबावर अहमदाबादमधील स्वतःच्या आश्रमात मुलांचं अपहरण करून त्यांना भीक मागायला लावण्याचा गंभीर आरोप झाला होता. नित्यानंद विदेशात परागंदा झाला आहे, गरज पडल्यास गुजरात पोलीस योग्य कारवाई करून त्याची कोठडी मिळवेल. नित्यानंद कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देशातून पळून गेला आहे. त्याला शोधणे म्हणजे वेळेचा अपव्यय करण्यासारखं आहे. भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल, असेही अहमदाबाद पोलिसांनी सांगितले त्याच्याबाबत माहिती देताना सांगितले होते. दरम्यान, नित्यानंद बाबाने कैलासा या राष्ट्राचे संकेतस्थळही सुरू केले आहे. या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार कैलासा हा देशा कॅरेबियन बेटांमधील त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या जवळ आहे. दरम्यान, नित्यानंद बाबाने एखाद्या सार्वभौम देशाप्रमाणे कैलासा या देशाचे मंत्रिमंडळही बनवले आहे. या देशाच्या सरकारमध्ये पंतप्रधान, लष्करप्रमुख अशी पदेही निर्माण करण्यात आली आहे, अशी माहिती कैलासा या राष्ट्राच्या संकेतस्थळावरून देण्यात आली आहे. 

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय