बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी सुमारे ५ कोटी मतदारांनी दिलेला कौल काही वेळातच समोर यायला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा राखण्यासाठी निर्देश दिले आहेत.
- सकाळी ८ वाजता पोस्टल मतदानाची मोजणी सुरुवातीला होणार-सकाळी ८.३० वाजता ईव्हीएमद्वारे मतदानाची मोजणी सुरू होणार- ४६ मतमोजणी केंद्रे - २,६१६ उमेदवार रिंगणात आहेत- एकूण मतदान ६७.१३ टक्के पोल ऑफ पोल्सएनडीए १५४महाआघाडी ८४अन्य ५२०१५ आणि २०२० मध्ये एक्झिट पोलचे सर्व अंदाज सपशेल खोटे ठरले होते.
बिहार विधानसभा २०२० मधील पक्षीय बलाबल
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला. दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले. बिहारमध्ये एकूण ७,४५,२६,८५८ मतदार असून, यापैकी ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. आता या विक्रमी मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Summary : Bihar election results today will decide between Nitish Kumar and Tejashwi Yadav. Counting begins at 8 AM. A record 67.13% voter turnout anticipates a close contest. The fate of 2,616 candidates hangs in the balance.
Web Summary : बिहार चुनाव के नतीजे आज नीतीश कुमार और तेजस्वी यादव के बीच फैसला करेंगे। मतगणना सुबह 8 बजे शुरू होगी। रिकॉर्ड 67.13% मतदान हुआ है। 2,616 उम्मीदवारों का भविष्य दांव पर है।