शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नितीश पायाला स्पर्श करू लागले, मोदींनी रोखलं, तरी...! चिराग यांचीही गळाभेट...; NDAच्या बैठकीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:20 IST

‘आपण रविवारी शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन केले आहे. आपण आजच पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी, असे आम्हाला वाटते,’ असेही नितीश कुमार म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर, शुक्रवारी देशाच्या जुन्या संसदेत एनडीएची बैठक पार पडली. यावेळी, भाजपच्या सर्व घटक पक्षांनी संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाला मंजुरी दिली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही नरेंद्र मोदी यांच्या नावाला सहमती दर्शवली. भाषण संपल्यानंतर नितीश जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटले तेव्हा त्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी त्यांना रोखले. यानंतर थोड्याच वेळात आपले भाषण संपल्यानंतर चिराग पासवान नरेंद्र मोदींजवळ आले, तेव्हा मोदींनी चिरागला गळ्याला लावले.नितीश कुमार आपल्या भाषणात म्हणाले, ’हे (नरेंद्र मोदी) गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधान आहेत आणि आता पुन्हा पंतप्रधान होत आहेत. पूर्ण विश्वास आहे की, जे काही राहिले आहे. हे सर्व पूर्ण करतील. प्रत्येक राज्याचे जे काही आहे, सर्व पूर्ण करतील. या लोकांनी निरर्थक बोलून आजपर्यंत कोणते काम केले आहे का? बिहारची सर्व कामे होतील. जी रीहिली आहेत आणि जे आपल्याला वाटते ते होईल.’ याशिवाय, ‘आपण रविवारी शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन केले आहे. आपण आजच पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी, असे आम्हाला वाटते,’ असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

चिराग पासवान म्हणाले, "मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. आपल्यामुळेच एनडीएला एवढा मोठा विजय मिळाला आहे. याचे संपूर्ण श्रेय आपल्याला जाते. ही एक अशी इच्छाशक्ती होती, जिने इतिहासातील एवढा मोठा विजय मिळविण्यास मदत केली. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एनडीएला सलग तिसऱ्यांदा एवढा मोठा विजय मिळाला, ही काही सामान्य गोष्ट नव्हती. आपल्यामुळेच आज आम्ही संपूर्ण जगाला अभिमानाने सांगू शकतो की, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारतीय जनतेचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी