नितिशकुमारांचे चाणक्य प्रशांत किशोर नाराज; केले भावनिक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 17:52 IST2019-03-29T17:51:46+5:302019-03-29T17:52:31+5:30
निवडणुकांचे चाणक्य समजले जाणारे प्रशांत किशोर हे जेडीयूमध्ये नंबर 2 चे नेते बनले खरे मात्र हेच यश त्यांना अडचणीचे ठरू लागले आहे.

नितिशकुमारांचे चाणक्य प्रशांत किशोर नाराज; केले भावनिक ट्विट
पटना : निवडणुकांचे चाणक्य समजले जाणारे प्रशांत किशोर हे जेडीयूमध्ये नंबर 2 चे नेते बनले खरे मात्र हेच यश त्यांना अडचणीचे ठरू लागले आहे. राजकीय डावपेच आणि केडर या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या जेडीयूच्या केडर असलेल्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुन्हा सुत्रे हातात घेतल्याने किशोर निवडणूक समितीपासून वेगळे पडले आहेत. या बाबतचे ट्विटही त्यांनी केले आहे. यामुळे प्रशांत किशोर आणि जेडीयूमध्ये काही आलबेल नाही असे संकेत मिळत आहेत.
किशोर यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की बिहारमध्ये एनडीए मोदी आणि नितीश कुमार यांच्या मजबूत नेतृत्वात लढत आहे. जेडीयूकडून निवडणूक प्रचार आणि समितीची जबाबदारी पक्षाचे वरिष्ठ नेते आपसीपी सिंह यांच्या मजबूत खांद्यांवर आहे. राजकीय कारकिर्दीच्या या सुरुवातीच्या काळात माझी भुमिका शिकणे आणि सहकार्याची आहे.
ज्या प्रशांत किशोर यांच्या निवडणूक कौशल्याला सर्व पक्ष मानतात, ज्यांनी अशा घोषणा बनविल्या ज्या लोकांच्या तोंडी आजही आहेत. त्यांना ऐन निवडणूक काळात पक्षाच्या समितीपासून दूर रहावे लागत आहे.