शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

नितीशकुमारांचे ‘रक्षा’बंधन; आठव्यांदा झाले मुख्यमंत्री; तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 06:48 IST

शपथविधीनंतर नितीशकुमार यांनी भाजपवर कडक टीका केली.

पाटणा : नऊ वर्षांत भाजपशी दुसऱ्यांदा काडीमोड घेतलेल्या नितीशकुमार यांनी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही शपथविधी पार पडला. सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करणे आवश्यक आहे, असा इशाराही नितीशकुमार यांनी दिला.

शपथविधीनंतर नितीशकुमार यांनी भाजपवर कडक टीका केली. त्यांनी सांगितले की, राजद व अन्य घटक पक्षांबरोबर आम्ही बिहारमध्ये स्थापन केलेले नवीन सरकार आपला कालावधी पूर्ण करणार नाही हा भाजपचा पोकळ दावा आहे. २०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेले भाजपचे सरकार २०२४ साली पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता कमी आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही नितीशकुमार यांनी केले. 

तेजस्वी यांनी घेतले नितीशकुमारांचे आशीर्वाद

राजभवनामध्ये झालेल्या समारंभात नितीशकुमार यांना राज्यपाल फागू चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव यांनी शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. 

आधी बहुमत; नंतर मंत्रिमंडळ

नितीशकुमार यांनी सरकारचे बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. भाजपचे ७७ सदस्य असून, तो दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. भाजपचा एकही नेता नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिला नाही. सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण मिळाले नसल्याचा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता.  नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला लालूप्रसाद यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत; पण त्यांच्या पत्नी राबडीदेवी आवर्जून उपस्थित होत्या. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा