शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नितीशकुमार-प्रशांत किशोर एकत्र?; पाटण्यात मध्यरात्रीच्या भेटीत दोन तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:48 IST

नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांच्याकडून पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मदतीची गरज व्यक्त केली आहे.

एस. पी. सिन्हापाटणा : भाजपची साथ सोडून महागठबंधनाची साथ करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता आपली डगमगणारी बोट किनाऱ्यावर लावण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची गरज पडली आहे. एकीकडे हे दोघेही एकमेकांविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत; तर दुसरीकडे रात्रीच्या अंधारात भेटीगाठी होत आहेत. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. यावेळी माजी खासदार पवन वर्मा उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांच्याकडून पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मदतीची गरज व्यक्त केली आहे. दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. प्रशांत किशोर पुन्हा एकदा आपल्याबरोबर यावेत, असा नितीशकुमार यांचा प्रयत्न आहे.  आपले जन-सुराज अभियान अयशस्वी झाल्यानंतर हादरलेले प्रशांत किशोर हे नितीशकुमार यांची साथ करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आतून भेट, वरून टीकाबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माध्यमांना सांगितले होते की, प्रशात किशोर यांना बिहारचे एबीसी तरी माहीत आहे का? ते तर व्यावसायिक आहेत. त्यांना भाजपमध्ये जायचे आहे. ते भाजपची मदत करतात. याला प्रत्युत्तर देताना प्रशांत किशोर यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. दोघेही वरून टीका करतात व आतून भेट घेतात, असे दोन-चार दिवसांतच उघड झाले आहे.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमार