भारीच! शेणापासून तयार केलेल्या पेंटला मिळतोय तुफान प्रतिसाद, फक्त 12 दिवसांत बंपर विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 03:02 PM2021-01-31T15:02:58+5:302021-01-31T15:11:12+5:30

Cow Dung Paint : खादी ग्रामोद्योग आणि जयपूर येथील एका इन्स्टिटयूटने संयुक्तपणे तयार केलेला हा पेंटची वेगाने विक्री होत आहे. 

nitin gadkari khadi gramodhyog commission natural cow dung paint bumper sale three thousand litre | भारीच! शेणापासून तयार केलेल्या पेंटला मिळतोय तुफान प्रतिसाद, फक्त 12 दिवसांत बंपर विक्री

भारीच! शेणापासून तयार केलेल्या पेंटला मिळतोय तुफान प्रतिसाद, फक्त 12 दिवसांत बंपर विक्री

googlenewsNext

नवी दिल्ली - ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच दरम्यान आता लवकरच गायीच्या शेणापासून बनवलेला पेंट बाजारात दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकल फॉर व्होकल (Local For Vocal) या संकल्पनेतून शेणापासून निर्मिती करण्यात येणाऱ्या पेंटला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या पेंटला लोकांची पसंती मिळत आहे. आपल्या स्वप्नातील घर रंगवण्यासाठी नागरिक आवर्जून या पेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. खादी ग्रामोद्योग आणि जयपूर येथील एका इन्स्टिटयूटने संयुक्तपणे तयार केलेला हा पेंटची वेगाने विक्री होत आहे. 

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, की या पेंटची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे. फक्त 12 दिवसांत साडेतीन हजार लीटर पेंटची विक्री झाली आहे. ही विक्री दिल्ली आणि जयपूरमधील 2 दुकानातूनच होत आहे. खादी ग्रामोद्योगने आता या पेंटची विक्री ऑनलाईन सुरू केली आहे. यामुळे देशभरातील लोक हा पेंट ऑर्डर करू शकणार आहेत. तसेच शेणापासून बनवण्यात आलेल्या या पेंटच्या तपासणी आणि चाचणी दरम्यान साडेतीन हजार लीटर विक्री झाली आहे. या पेंटच्या तपासणीचे काम अद्यापही सुरुच आहे. 

कोणतीही कंपनी जेव्हा पेंट तयार करते तेव्हा त्यात एक वॉलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड (VOC) असतं. यात काही हानीकारक घटक असतात, पेटिंग करताना ते वास किंवा वायू स्वरुपात बाहेर पडतात. यामुळे पेटिंग करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये जळजळ सुरू होते. चाचणी किंवा अंतिम अहवालानुसार शेणापासून बनवलेल्या या पेंटमध्ये व्हीओसीची मात्रा असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे कोणाताही त्रास जाणवणार नाही. एक पर्यावरणपूरक उत्पादन असल्याची प्रतिक्रिया खरेदीदार ग्राहकांनी दिली असून या कारणामुळेच त्याला अधिक पसंती मिळत आहे. गायीपासून मिळणाऱ्या उपयुक्त पदार्थांपासून उत्पादने बनवणे हा यामागील उद्देश असून हा उद्देशच लोकांना अधिक भावताना दिसत आहे. 

गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या पेंटचे अनेक फायदे

12 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते हा पेंट लाँच करण्यात आला. लाँच करण्यापूर्वी गडकरी यांनी या पेंटचा वापर आपल्या घराचे दरवाजे रंगवण्यासाठी केला. खादी ग्रामद्योगच्या अनेक इमारती या पेंटनेच रंगवण्यात आल्या आहेत. या पेंटच्या निर्मितीचे काम प्रामुख्याने गोशाळांमध्येच सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून शेणापासून महिना 4500 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या पेंटचे अनेक फायदे आहेत. हा पेंट अँटी बॅक्टिरियल, अँटी फंगस आहे. तुलनेने खूपच स्वस्त आहे, तसेच यात कोणत्याही घातक धातूंचा समावेश करण्यात आलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: nitin gadkari khadi gramodhyog commission natural cow dung paint bumper sale three thousand litre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.